Modi government on the hump | मोदी सरकार कुबड्यावर! महागाई वाढण्याची शक्यता, सर्वसामान्यांवर होणार ताण!
नवीन सरकार, जुनीच महागाई!
नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणीत एनडीए सरकारने सलग तिसऱ्यांदा सत्ता हासिल केली असली तरी, हे सरकार कुबड्यावर आहे. महागाईचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आणि येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
वाचा:Gold Silver Price | सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ! लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना फटका
केंद्र सरकारचा दबाव हटला की वाढणार भाव
केंद्र सरकारच्या दबावामुळे गेल्या दोन महिन्यापासून सर्वच धान्यासह डाळींचे भाव स्थिरावलेले होते. मात्र, हे निर्बंध पुढील काही दिवसात हटण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच धान्यांसह डाळ आणि तेलाच्या दरात वाढ होणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांकडून मिळत आहेत.
तुरी डाळ २०० रुपयांच्या टप्प्यावर!
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तुरीच्या डाळींची सरासरी किंमत १७० रुपये होती ती आता १९० रुपयांवर गेली आहे. पुढील महिन्याभरात तूर डाळ २०० रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय गव्हाच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. ३२ रुपये किलो असलेला गहू आता ३४ रुपयांवर गेला आहे. खाद्य तेलाच्या दरातही वाढ अपेक्षित आहे.
तांदळही झाला महाग
तांदळाच्या दरातही वाढ झालेली आहे. प्रतिकिलो तांदूळ दोन रुपयांनी महागले आहे. एक किलो तांदळासाठी पूर्वी ६० रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी आता ६२ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच ५० रुपये किलो असलेल्या तांदळासाठी ५२ रुपयावर गेले आहे.
सर्वसामान्यांवर होणार ताण
या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचा दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची शक्यता आहे. सरकारने तात्काळ यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
बाजारात गर्दी वाढली
उन्हाळ्याच्या शाळेच्या सुट्या संपल्या असून पुढच्या आठवड्यात सीबीएससीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शालेय साहित्यांची खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढलेली आहे. परिणामी, धान्य बाजारातील वर्दळ कमी झालेली आहे. ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने धान्यांसह खाद्य तेलाचे भाव स्थिरावलेले आहेत. तसेच लग्नसराईचा मोसमही थंडावल्याने बाजारातील मंदीचा माहोल आहे.