कृषी बातम्या

Cotton Farming | कापूस लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान! जाणून घ्या सविस्तर माहिती…

कापूस हे राज्यातील एक महत्त्वाचे नगदी पीक (Cash peak) आहे. कापूस या पिकासाठी सामाजिक, राजकीय व आर्थिक या बाबतीत एक अनन्यसाधारण स्थान आहे.

Cotton Farming | भारतात लोकांना ६ कोटी कापूस शेती (Cotton farming) तसेच कापूस पिकावर (Cotton crop) आधारित रोजगार (Employment) उपलब्ध होतो उद्योगावर रोजगार उपलब्ध होतो. राज्यामध्ये जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. वाणाची लागवड झाली होती.

कापूस पिकाचे लागवड व्यवस्थापन
Land | जमीन

पाण्याचा निचरा होणाऱ्या उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर लागवड करावी. (जमिनीचा सामू ६ ते ८.५ पर्यंत).हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये.कपाशी हे साधारण ६० ते ७५ सेंमी पावसाच्या प्रदेशात चांगले येते. बियाणांची उगवण होण्यासाठी किमान १५°C तापमान.पिकाच्या अपेक्षित वाढीसाठी २१ ते २७° C तापमान, फुलपाती फळधारणा चांगली होण्यासाठी २७- ३३° C तापमान आवश्यक असते.

वाचा: Onion | नाफेड करणार तब्बल 4 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मिळणार योग्य भाव

Sowing time | पेरणीची वेळ
पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर सांगली व पुणे जिल्ह्यात कापूस शेती मार्च महिन्यात केली जाते. नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पहिल्या पंधरवड्यात कापसाची लागवड केली जाते. मराठवाडा व विदर्भात बगायती कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी.

Seed processing | बीज प्रक्रिया
थायरम किंवा कॅप्टन किंवा सुडोमोनास या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करण्यासाठी ॲझेटोबॅक्टर/ॲझोस्पिरीलम व स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे गुळाच्या पाण्यात घट्ट मिश्रण तयार करून बियाण्यास चोळावे व सावलीत वाळवावे.

Sowing | पेरणी
पेरणीची वेळ बागायती कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली असेल. मात्र, कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मॉन्सूनचा तीन-चार इंच पाऊस पडल्यानंतरच करावी. पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एकरी क्विंटलपर्यंत घट होऊ शकते.धूळपेरणी मध्यम ते भारी जमिनीत मॉन्सून पाऊस येण्याचा अंदाज घेऊन ७ ते ८ दिवस अगोदर पेरणी करावी.

Fertilizer Management | खत व्यवस्थापन
संकरित कापसासाठी प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश, तर सुधारित वाणांसाठी ८० किलो गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर द्यावे किंवा खते कमी असल्यास लागवडीच्या वेळी प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर शेणखत टाकावे व मातीत चांगले मिसळावे. वीस टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्र समान दोन हप्त्यांत पेरणीनंतर ३० व ६० दिवसांनी द्यावे. बीटी वाणासाठी शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के रासायनिक खतमात्रा (१२५:६५:६५ किलो प्रति हे.) जास्त घ्याव्यात.नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकांव्यतिरिक्त कापूस पिकास मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त, मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुध्दा गरज असते.

Varieties | वाण
महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी आयसीएआर-केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने प्रसारित केलेले वाण – आयसीएआर-सीआयसीआर पीकेव्ही ०८१ बीटी, आयसीएआर-सीआयसीआर रजत बीटी, आयसीएआर-सीआयसीआर सुरज बीटी, आयसीएआर-सीआयसीआर जीजेएचव्ही ३७४ बीटी.
• देशी कापूस सरळ वाण- पी ए २५५ , पी ए ४०२, ए के एच ५
• अमेरिकन कापूस सरळ वाण- एणएच ४५२ ,एणएच ५४५

वाचा: Drone Subsidy | शेतकऱ्यांनो आता फवारणी होणार अजून सोपी, कारण सरकारच ‘या’साठी देणार 5 लाखांच अनुदान

Intercrop | आंतरपिके
उडीद व सोयाबीन ही आंतरपिके १:१ प्रमाणात (कापसाच्या एका ओळीनंतर आंतरपिकाची एक ओळ) घेतल्यास फायदेशीर ठरते.कपाशीच्या ६ ओळीनंतर तुरीची १ ओळ किंवा कपाशीच्या ८ ओळीनंतर तुरीच्या २ ओळी घेणे ही आंतरपीक पद्धती राज्यात राबवली जाते.

Sowing distance | पेरणीची अंतर
बीटी कापूस कोरडवाहू लागवड : १२० x ४५ सें.मी. (४ x १.५ फूट)
बीटी कापूस बागायती लागवड : १५o x ३० सें.मी. (५ x १ फूट) किंवा १८o x ३० सें.मी. (६ x १ फूट)
आय सी ए आर-केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने विकसित केलेल्या वाणांची ९० x ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button