आळंबी हा एक भुर्शी चा प्रकार आहे. आळंबी च्या विविध प्रजाती असून तो कमी जागेत आणि कमी गुंतवणूक करून शेतीपूरक व्यवसाय करू शकतो. आळंबी एकप्रकारे वनस्पती आहे. परंतु त्यामध्ये हरितद्रव्य नसते. यामध्ये भरपूर प्रथीने व पोषक घटक असतात. त्यामुळे भारतीयबाजारामध्ये तसेच बाहेरील देशामध्ये उदाहरणं इटली , चीन, अमेरिका या देशात खुप मागणी आहे.
आळंबी मध्ये खुप प्रजाती असल्यामुळे काही खाण्यायोग्य असतात. तर काही खाण्या योग्य नसतात. मात्र आपल्या देशात खाण्यायोग्य जाती लावल्या आहेत.
👉 आळंबीची वैशिष्टे :
🔹 आळंबी मध्ये भरपूर जीवनसत्व, प्रथिने, कर्बोदके, खनिजे, यांचा भरपूर स्रोत आहे.
🔸 आळंबी चे उत्पन्न घेण्यासाठी जास्त जमिनीची आणि मोठि गुंतवणूक करण्याची गरज नसते.
🔹मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
🔸 परकीय चलन यामध्ये मिळून भरपूर कमाई करू शकतो.
🔹जागतिक बाजारपेठेत आळंबीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
🔸 आळंबी चे उत्पन्न घेण्यासाठी जास्त किचकट व गुंतागुंतीची प्रक्रिया नाही.
🔹कमी मनुष्यबळ लागणारा हा व्यवसाय आहे.
आळंबी चे प्रकार
➡️ पांढरे बटन आळंबी, भारताच्या भुश्या यावरील आळंबी, धिंगरी आळंबी.
➡️ हिमाचल प्रदेशातील सोलन शहर आळंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आपण भारतीय संशोधन केंद्र तसेच कृषी केंद्र इथे जाऊन आळंबी तंत्रज्ञान व पूरक व्यवसाय यावर माहिती घेऊ शकतो.
WEB TITLE: Millions of rupees can be earned by investing less from alambi farming …