Milk Rate | मोठी बातमी ! दुधाचे भाव झाले कमी ; पन काय आहे त्यामागील कारण जाणून घ्या सविस्तर …
Milk Rate | Big news! The price of milk decreased; Know the reason behind what Pun is in detail…
Milk Rate | कोरोना महामारीमुळे दुग्धजन्य पदार्थांची निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दूधउत्पादन वाढल्याने आणि निर्यात कमी झाल्याने (Milk Rate) गाईच्या दुधाचे दर २६ ते ३२ रुपये प्रतिलिटरवर आले आहेत.
राज्य सरकारने गाईचे दूध ३४ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा आदेश खासगी आणि सहकारी दूध संघांना दिला आहे. तरीही राज्यात सर्रास गाईच्या दुधाची खरेदी २६ ते ३२ रुपये प्रतिलिटर दराने सुरू आहे. राज्यात दैनंदिन सरासरी एक कोटी ९० लाख लिटर दूधउत्पादन होते. त्यात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होऊन दूधसंकलन दोन कोटी १५ लाख लिटरवर गेले आहे. दुधाला मागणी नसण्याच्या काळात अतिरिक्त दूध उत्पादनामुळे गाईच्या दुधाचे दर कोसळले आहेत.
कोरोनाच्या टाळेबंदीपासून राज्यातून दूध पावडर, केसीन, बटर आणि चीज या दुग्धजन्य पदार्थांची निर्यात विस्कळीत झाली आहे. राज्यभरातील दूध प्रक्रिया प्रकल्पांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचे साठे पडून आहेत. त्यामुळे प्रक्रियादारांकडून दुधाला असलेली मागणी कमी झाली आहे. महाराष्ट्र दूध उत्पादनातील आघाडीवरील राज्य असल्यामुळे केरळ दूध फेडरेशन, बिहार दूध फेडरेशन, दिल्ली या राज्यांतून आणि मदर डेअरीसारख्या मोठ्या प्रक्रियादारांकडून दुधाला मागणी असते. पण, आता देशाच्या त्या त्या भागात अपेक्षित दूधउत्पादन होत असल्यामुळे राज्यातील दुधाला असलेली मागणीही ठप्प झाली आहे.
वाचा : UPI ID Closed | सावधान! तुमचा UPI आयडी बंद होऊ शकतो; 31 डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करा जाणून घ्या सविस्तर …
दुग्धजन्य पदार्थांची निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी आणि दूधउत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने निर्यात अनुदान आणि दूधउत्पादक शेतकऱ्यांना थेट प्रतिलिटर अनुदान देण्याची गरज आहे. या दोन मार्गांशिवाय दूधदराचा गंभीर प्रश्न सुटणे शक्य नाही.
दुग्धदर वाढवण्यासाठी सरकारने या उपाययोजना कराव्यात
- दुग्धजन्य पदार्थांची निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी निर्यात अनुदान द्यावे.
- दूधउत्पादक शेतकऱ्यांना थेट प्रतिलिटर अनुदान द्यावे.
- दूध प्रक्रियादारांमधील अघोषित व्यावसायिक स्पर्धा थांबवावी.
- दूध संघांवर खरेदीच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे.
- दूध उत्पादकांना दूध प्रक्रिया प्रकल्पांमध्ये थेट सहभागी करावे.
या उपाययोजना केल्यास दूधदर वाढून दूधउत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
हेही वाचा :
Web Title : Milk Rate | Big news! The price of milk decreased; Know the reason behind what Pun is in detail…