ताज्या बातम्या

दुधाच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ, तर सोयाबीन, सूर्यफूल तेलामध्ये घसरण…

Milk prices rise by Rs 2, soybean, sunflower oil fall

गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपये वाढ करण्यात आली आहे. पण त्याचा शेतकरी वा सामान्य दूधउत्पादकांना फारसा फायदा होणार नाही.

रोज लागणाऱ्या आवश्‍यक वस्तूंपैकी खाद्यतेल (Edible oil), पेट्रोल(Petrol), डिझेल(Diesel), गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होत आहे. खाद्यतेलाच्या किमतीतही महामारीत वाढ झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर तीन महिन्यांपासून १८० ते १८५ रुपये किलो आहेत, तर सूर्यफूल व सोयाबीनच्या दरात २० ते २२ रुपयांची घसरण झाली आहे. (ladies good news edible oil price is low)
पामतेलाचा दर १५० ते १५५ होता, तो आता खाली येऊन १२८ प्रतिकिलो आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

तेलाच्या दरवाढची अनेक कारणे आहेत. त्यात शासनाने इंर्पोट ड्यूटीत सोबत इतर करांमध्ये झालेली वाढ, शेंगदाणा, सोयाबीनला योग्य भाव न मिळणे, कमी पावसामुळे सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीनचे उत्पादन कमी होणे आदी कारणांचा समावेश असल्याचे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा :
अशा’ रीतीने करा कांद्याची साठवण; होणार नाही दोन वर्ष कांदा खराब !

Technology : टेलिग्रामचे ढासू फीचर्स! एकाच वेळी 30 जणांशी व्हिडिओ कॉल वर बोलता येणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button