फळ शेती
Orchard |मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीचे वेळापत्रक जाहीर!
Orchard |पुणे, १८ जून २०२४: कृषी आयुक्तालयाने खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या फळबाग लागवड कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर ‘मनरेगा’तून फळझाडे लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलाश मोते यांनी दिली.
अर्ज कसे करावे?
- कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी योजनेला जून महिन्यापर्यंत व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक महसूली गावात २४ तास अर्ज सादर करता येईल अशा ठिकाणी अर्ज पेटी ठेवण्यात येतील.
- पत्र पेटी दर सोमवारी ग्राम रोजगार सेवकांनी उघडून सर्व अर्ज ऑनलाइन करण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे.
महत्त्वाचे टप्पे:
- मे महिनाअखेर: लाभार्थ्यांच्या प्रकल्पाची स्थळ पाहणी
- जूनच्या पहिल्या आठवड्यात: माती परिक्षणाचे नमुने घेणे
- जूनच्या पहिल्या आठवड्यात: क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी सादर करणे
- जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात: वार्षिक कृती आराखड्याप्रमाणे कामास प्रशासकीय मंजुरी (Approval)
- जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात: खड्डे खोदणे आणि आनुषंगिक कामे
- जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत: माती, खते, कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांचा वापर करून खड्डे भरणे
- जून ते डिसेंबर: कलमे आणि रोपांची लागवड
- ऑगस्टअखेर: कलमे-रोपे रोपवाटिका (Nursery) ते शेतापर्यंत वाहतूक आणि निविष्ठा व औषधांची उपलब्धता
- जून ते डिसेंबर: कलमे-रोपांची पूर्ण लागवड
अधिक माहितीसाठी:
- आपण आपल्या जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांचा संपर्क साधू शकता.