हवामान

पुढील 48 तासात ‘या ‘शहरांमध्ये हवामान विभागाकडून सतर्क चा इशारा!

Meteorological department warns of 'these' cities in next 48 hours!

गेल्या काही दिवसांमध्ये हवामान मध्ये खूप सारे बदल घडत आहेत कधी अचानक पाऊस पडतो. तर कधी अचानक तीव्र उन्हाळा भासतो मागील आठवड्यामध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना भरपूर त्रास झाला . या आठवड्यामध्ये कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. शिमग्या आधीच मुंबई-कोकण उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. करोना चे थैमान आणि त्यातला हा उन्हाळा त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (Maharashtra weather update heat waves )

पुढील 48 तास उष्णतेची ही लाट मुंबईसह संपूर्ण कोकण प्रांतात कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्यातून दिली आहे. उत्तरेकडून व ईशान्येकडून कोरड्या वाऱ्यामुळे कोकणचे हवामानात बदल होणार आहे असे खात्याकडून सांगण्यात येत आहे.

सातत्याने बदलणारी हवामान यामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यामध्ये आरोग्याची व आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी वेळोवेळी पाणी प्या, भाज्या व फळे खा, जेवण्याच्या त् वेळा पाळा आणि शरीराला त्रास होईल असे काही खाऊपिऊ नका. उन्हाळ्या बरोबरच आपल्याला कोरोनाच्या या संकटाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button