हवामान
ट्रेंडिंग

हवामान खात्याचा इशारा: राज्यात या ठिकाणी होणार गडगडाटासह पाऊस…

Meteorological Department warns पाऊस Thunderstorms in this part of the state

महाराष्ट्राला अगोदरच कोरोना च्या संकटाने वेढलेले असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोमवारी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. मंगळवारी पुण्यात आणि नाशिक मध्ये जोरदार पाऊस झाला. आता मुंबई वेधशाळेने (IMD Mumbai) महाराष्ट्रात पुणे (Pune), सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा: रेशन मिळताना अडचण येते का? मग करा, “या” टोल फ्री नंबर वर एकदा कॉल; रेशन डीलर ची मनमानी येथून पुढे चालणार नाही…

मुंबई वेधशाळेचे ज्येष्ठ हवामान तज्ञ के, एस,होसाळीकर यांनी ट्विट (tweet) करून माहिती दिलेली आहे. त्यांनी लिहिले हवामान खात्याच्या निदर्शनास आले आहे की अनेक ढग हे जमा होत आहेत. हवामानामध्ये होत असलेल्या तापमानाच्या बदलांमुळे जास्त तापमान असलेले ढगे वरती जाऊन थंड तापमान असलेले खालच्या बाजूला येत आहेत. ही प्रकिया मध्य महाराष्ट्र, घाट विभागांमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने पुणे सातारा आणि नाशिक या ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे.

नाशिक मध्ये सोमवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. दमदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

हेही वाचा: ऊसदराचा (एफआरपी) प्रश्न पुन्हा पेटणार! जाणून घ्या काय आहे या मागचे कारण?

पुणे शहरात मंगळवारी झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह, गडगडाटासह पाऊस झाला. मागच्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि भुदरगड तालुक्‍यातील काही ठिकाणी गारपिट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे कोल्हापूर मध्ये दोन दिवस सलग मुसळधार पाऊस पडला होता. तर हवामान खात्याकडून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना हा सतत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: टॅक्टर घेणे होणार महाग! ट्रॅक्टर दरवाढ होण्यामागे ही आहेत महत्त्वाची कारणे…

हेही वाचापंतप्रधान “कृषी सिंचन योजनाचा” फायदा मिळण्यासाठी इथे करा अर्ज…हापुस आंबा ओळखण्यासाठी कोकणातील बागायतदारांनी केला हा मॉडर्न उपाय..

खरीप हंगामासाठी, कृषी विभागाची महत्वपूर्ण बैठक बैठकीमध्ये हे झाले शेतकऱ्यांचे हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button