Mauni Amavasya | अरे देवा! ‘या’ 5 राशींच्या लोकांमागे शनीची साडेसाती, अमावस्येला करा हे उपाय अन्यथा घडेल दुर्घटना
Mauni Amavasya | हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी बारा अमावस्या येतात आणि यापैकी माघ महिन्यातील अमावस्या ‘मौनी अमावस्या’ (Mauni Amavasya) म्हणून ओळखली जाते. या दिवशी प्रयागराजमध्ये देव आणि पितरांचा संगम होतो. मनु ऋषींचा जन्मही मौनी अमावस्येला झाला होता. व्रत, दान आणि स्नान यांना या दिवशी विशेष महत्त्व आहे.
शनीच्या साडेसातीपासून मुक्तीसाठी काय करावे उपाय?
ज्योतिषशास्त्रानुसार, अमावस्येच्या दिवशी शनिशी संबंधित उपाय केल्याने शनीची साडेसाती आणि ढैय्यापासून मुक्ती मिळू शकते.
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा
मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर “ओम शम शनैश्चराय नमः” या मंत्राचा जप करावा. हा उपाय शनीच्या दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि साडेसाती-ढैय्यापासून मुक्तीसाठी फायदेशीर मानला जातो.
वाचा | Hand Transplant India | दिल्लीत डॉक्टरांनी केला चमत्कार! मृत महिलेचे हात बसवून अपंग रुग्णाला दिले नवे जीवन
मोहरीचे तेल दान करावे
मौनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला मोहरीचे तेल दान करावे. यासोबतच थोडी दक्षिणा द्यावी. हा उपाय शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्तीसाठी लाभदायक मानला जातो.
पितृदोष आणि शनिदोष मुक्ती
धार्मिक मान्यतेनुसार, पितृदोष आणि शनिदोषांपासून मुक्तीसाठी मौनी अमावस्येच्या दिवशी काळ्या मुंग्यांना काळे तीळ, मैदा आणि साखर मिसळून खाऊ घालावे.
Web Title | Mauni Amavasya | Oh God! Follow these 5 zodiac sign people on Saturn’s seven and a half, do this remedy on Amavasya otherwise disaster will happen.
हेह वाचा