पणन महासंघाची घोषणा; कापूस खरेदी होणार दिवाळीच्या मुहूर्तावर, शेतकऱ्यांना दिल्या विशेष सूचना..
कापूस खरेदी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरु होणार आहे. त्यामुळे आता कापसाला चांगला भाव मिळावा असे अपेक्षित आहे. कापूस उद्योजकांना याचा फायदा होईल. पणन महासंघाच्या ५० केंद्रावर तर सीसीआय च्या ७४ केंद्रावर कापूस खरेदी प्रक्रिया केली जाणार आहे आणि चांगल्या दर्जाच्या कापसाला ६०२५ असा हमीभाव मिळणार आहे.
वाचा – “या” जिल्ह्यांचा पिक विमा दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार…
महत्वाच्या सूचना –
राज्यात ११६ तालुक्यात १२४ कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया पणन महासंघाकडून सुरु करण्यात येणार आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये कापसाची घट बरीच झाली आहे. त्यामुळे उरलेल्या कापसाला चांगला हमीभाव मिळण्याची अपेक्षा आहे. अपेक्षित उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. कोणत्याही शेतकर्यांना जास्तीत जास्त १२ किंटल पर्यंतच कापूस पणन महासंघाने सांगितले आहे. तसेच शेतकर्यांना वाळवलेला कापूस घेवून येण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. हा कापूस खरेदी केंद्रावर आणताना बैलगाडी, ट्रॅक्टर, किंवा चारचाकी मध्ये घेवून येण्यास सांगितले आहे.
वाचा –
ही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक –
1) कापूस विक्रीसाठी नेताना शेतकऱ्यांनी कापूस पिकाची नोंद असलेला अद्यावत सातबारा घेऊन यावा.
2) जनधन बँक खाते असलेले बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणू नये, त्या ऐवज राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेल्या पासबुकचे झेरॉक्स सोबत आणावे ज्यात बँक खाते क्रमांक आणि IfSC कोड सुस्पष्ट दिसेल.
3) आधारकार्ड सोबत आणावे असे आवाहन कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर यांनी केले आहे.
कापूस विक्री केल्याच्या आठ दिवसांत कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
वाचा –