ताज्या बातम्या

Marhan Video | शेतकऱ्यानं वीज वितरणाच्या अभियंत्याला केली वायर ने मारहाण; पहा व्हिडिओ..

Marhan Video | Farmer beats electricity distribution engineer with wire; Watch the video..

Marhan Video | यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पिंपरी-सावित्री येथे एका शेतकऱ्यानं वीज वितरणाच्या अभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. (Marhan Video) या प्रकरणात प्रकाश देहारकर या शेतकऱ्याविरोधात राळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती अशी की, प्रकाश देहारकर या शेतकऱ्यानं वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला होता. मात्र वीज जोडणी मिळाली नसल्यानं देहारकर याने तत्पुरत्या स्वरुपात केबल टाकून शेतात सिंचणाची व्यवस्था केली. मात्र ही बातमी वीज वितरण विभागाला कळाल्यानंतर सहाय्यक अभियंता गिरी हे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले.

गिरी यांनी शेतकऱ्यानं तत्पुरत्या स्वरुपात केबल टाकून केलेल्या वीजेच्या व्यवस्थेवर आक्षेप घेतला. त्यामुळे शेतकऱ्याला संताप अनावर झाला. त्यानं संतापाच्या भरात अभियंता गिरी यांना हातात असलेल्या वायरनं मारहाण केली.

या घटनेमुळे वीज पुरवठा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

वाचा : Job Recruitment | खासगी कंपन्यांमध्ये लगेच नोकरीची संधी! महायुती सरकारचा तरुणांसाठी महत्वाकांक्षी प्लॅन

शेतकऱ्याला वीज जोडणीसाठी प्रतीक्षा

या घटनेत मारहाण झालेल्या अभियंता गिरी यांनी सांगितले की, प्रकाश देहारकर या शेतकऱ्यानं वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. मात्र वीज जोडणीसाठी काही कागदपत्रं अपूर्ण असल्यानं त्याची वीज जोडणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यानं स्वतःहून केबल टाकून सिंचणाची व्यवस्था केली होती.

या प्रकरणात प्रकाश देहारकर याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना यवतमाळ जिल्हा महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद भोसले म्हणाले की, शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी तात्काळ मदत करण्यात येईल.

हेही वाचा :

Web Title : Marhan Video | Farmer beats electricity distribution engineer with wire; Watch the video..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button