ताज्या बातम्या

Maratha Reservation Protest | जाळपोळ बंद करा, नाहीतर.. आज रात्री आणि उद्या दिवसा जाळपोळ केली तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल…

Maratha Reservation Protest | Stop the arson, otherwise.. if arson is done tonight and tomorrow day, a different decision will have to be taken...

Maratha Reservation Protest | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर (Maratha Reservation Protest ) मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

जरांगे पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “मराठा समाज हा शांततेप्रिय समाज आहे. आमच्या आंदोलनाचा उद्देश हा शांततेने आरक्षण मिळवणे हा आहे. जाळपोळ आणि तोडफोडीमुळे आमच्या आंदोलनाला डाग लागत आहे. या घटना घडवून आणणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.”

जरांगे पाटील म्हणाले

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विनंती केली की, “आज रात्री आणि उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केल्याची किंवा नेत्याच्या घरी गेल्याची बातमी आलेली नकोय. नाहीतर मला उद्या संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल.”

वाचा : Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करताना केली आत्महत्या, नवा वाद पेटण्याची शक्यता..

जरांगे पाटील यांनी असा अंदाज व्यक्त केला की, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांमागे सत्ताधाऱ्यांचे हात असू शकतात. त्यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाजाला शांततेने आपला हक्क मिळवण्यासाठी लढावे लागेल. उद्रेक केल्याने आमच्या आंदोलनाला हानी पोहोचेल.”

या आवाहनाला मराठा समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अनेक मराठा कार्यकर्त्यांनी जाळपोळीच्या घटनांवर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Web Title : Maratha Reservation Protest | Stop the arson, otherwise.. if arson is done tonight and tomorrow day, a different decision will have to be taken…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button