ताज्या बातम्या

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंदची हाक; मनोज जरांगेच आमरण उपोषण सुरू

Maratha Reservation | Maharashtra bandh call for 'Ya' day once again for Maratha reservation; Manoj Jarang started hunger strike

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यभरात आंदोलनाची ज्वाला पेटली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सकल मराठा समाजाने येत्या 14 फेब्रुवारीला शांततापूर्ण महाराष्ट्र बंद आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत.

सकल मराठा समाजाकडून व्हायरल होत असलेल्या मेसेजनुसार, 14 फेब्रुवारीला राज्यातील सर्व दुकानं, बाजारपेठा, शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच वाहतूक बंद ठेवून शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

वाचा | Agri Business | काय सांगता? ‘या’ 5 पिकांच्या लागवडीतून शेतकरी कमावतील लाखो रुपये; जाणून घ्या कोणती?

कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देणे आणि सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणे या प्रमुख मागण्यांसाठी जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. मागील वर्षी शिंदे सरकारने या मागण्या मान्य करून जीआर जारी केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

या महाराष्ट्र बंदला राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आरक्षणासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी या संघटनांनी सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्र बंदमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याबाबतची दखल घेऊन आवश्यक ती तयारी करावी.

Web Title | Maratha Reservation | Maharashtra bandh call for ‘Ya’ day once again for Maratha reservation; Manoj Jarang started hunger strike

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button