मराठा आरक्षण रद्द! राज्यातील “या” भागातील कार्यकर्त्यांनी नोंदवला निषेध…
Maratha reservation canceled! Activists in "this" part of the state reported protest.
इस्लामपूर मध्ये मराठा समाज (maratha reservation) आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात आलेल्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध नोंदवला आहे. मराठा आरक्षण देण्यासारखी स्थिती राज्यात नाही हे कोर्टाचे म्हणणे चुकीचे व निषेधार्थ आहे. आम्ही पुन्हा लढा उभा करु व आरक्षण (Reservations) मिळवू. सगळ्याच मराठा नेत्यांचा व राजकीय पक्षांचा मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो.
पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून काळ्या फिती लावून सरकारच्या निषेधाच्या घोषणा. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे , धनंजय जाधव , तुषार काकडे रघुनाथ चित्रे , बाळासाहेब आमराळे यांनी सहभाग नोंदविला. सर्वोच्च न्यायालयाने (The Supreme Court) मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
तरी नागरिकांनी निकालानंतर संयम बाळगा, उद्रेक करायचा विचार करु नका असे आव्हान छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे.
२)रोगनियंत्रण; शेळया-मेंढयाांमधील बुळकाडी ( पेस्ट-डेस-पेटीट्स रुमीनन्टस..