ताज्या बातम्या

Maratha Resarvation | मोठी बातमी ! मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा कडक इशारा ;जाणून घ्या काय ?

Maratha Reservation | Big news! Manoj Jarange Patil's strict warning for Maratha reservation; Know what?

Maratha Resarvation | २४ ऑक्टोबर २०२३, पुणे – मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपला आहे. मात्र, अजूनही सरकारने मराठा (Maratha Resarvation) आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.

या पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला कडक इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, आजपर्यंत सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे, आता सरकारला मराठा समाजाच्या दबावाखाली येण्याची वेळ आली आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, आज दिवसभर आणि रात्रीपर्यंत सरकारकडे वेळ आहे. त्यांना जे काही करता येईल ते ते करावेत. जर आजपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर उद्यापासून सरकारला आमच्याशी बोलण्याचा अधिकार राहणार नाही.

वाचा : Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठीच्या सभेला निधी कुठून? भुजबळांनी जरांगेंना सवाल जाणून घ्या सविस्तर ..

काय म्हणाले जरांगे पाटील ?

जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाज आता शांततेत आंदोलन करत आहे. मात्र, जर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर समाज तीव्र आंदोलनाला सुरुवात करेल.

जरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीलाही पाठिंबा दिला आहे. त्यांनी सांगितले की, मराठा आणि धनगर समाज एकत्र येऊन लढला पाहिजे. जर एकजूट झालो तरच आमच्या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागतील.

जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर राज्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत लवकरच निर्णय घेऊन समाजात शांतता राखण्याची गरज आहे.

हेही वाचा :

Web Title : Maratha Reservation | Big news! Manoj Jarange Patil’s strict warning for Maratha reservation; Know what?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button