हवामान

Mansoon Rain | मान्सूनने आजही काही भागात केली प्रगती, पुढील २४ तासात आणखी वाढण्याची शक्यता! या जिल्ह्यांत लावणार हजेरी

Mansoon Rain | मान्सूनने आजही काही भागात प्रगती केली आहे. श्रीलंका, आग्नेय बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालचा उपसागर या भागात मान्सून (Mansoon Rain) आता पोहोचला आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये या भागात मान्सून आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

चक्रीवादळाचा अंदाज:
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अति कमी दाब क्षेत्राचे रुपांतर आज सायंकाळपर्यंत चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. तर उद्या सकाळपर्यंत याचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उद्या मध्य रात्रीपर्यंत बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान सागर बेट आणि खेपूपुरा दरम्यान सरकण्याची शक्यता आहे.

वाचा |Car | कार चालवताना कोणती कागदपत्रे सोबत ठेवावी? दंड टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी काय आवश्यक आहे?

राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस आणि उष्णतेची लाट:
हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उद्या हवामान कसे असेल:
हवामान विभागाने उद्या राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button