शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार - मी E-शेतकरी
योजना

Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहिरीसाठी ‘इतकं’ वाढीव अनुदान; महत्त्वपूर्ण अटही रद्द

Subsidy | भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशातील जवळपास 65 टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेती (Agriculture) व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र शेती करणं देखील सोपी गोष्ट आहे का? याचमुळे सरकार विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देतं. शेती (Agricultural Subsidy ) करताना सर्वात जास्त गरज असते ती पाण्याची. यामुळे शेतकऱ्यांना (Lifestyle) पाण्याची साठवणूक करण्यासाठी विहीर खांदणे गरजेचे आहे. परंतु यासाठी मोठ्या प्रमाणात (Financial) आर्थिक भांडवल लागते. म्हणूनच मनरेगा सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरींसाठी अनुदान (Subsidy) दिले जाते. आता यामध्ये मोठा बदल करून अनुदानात वाढ करण्यात आली आहे.

वाचा: ब्रेकिंग न्युज: आत्ता मिळणार पैसा च पैसा..कापसाचे होणार भरघोस उत्पादन उत्पादन ! ‘ हे ‘ नवीन वाण विकसित ..!

विहीरीच्या अनुदानात वाढ आणि अट रद्द
आता मनरेगा सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर याप्रमाणे अनुदान (Lifestyle) मिळणार आहे. ज्याचं कारण म्हणजे या योजनेची अंतराची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी (Department of Agriculture) आता विहिरीसाठी अर्ज करू शकतात. दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही. ही अट रद्द केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

लाभार्थी निवड
• अनुसूचित जाती
• अनुसूचित जमाती
भटक्या जमाती
• निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
• दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
• स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
• शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
• जमीन सुधारणांचे लाभार्थी
• इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थीजे)
• अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी
• सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)
अल्प भूधारक (5 एकर पर्यंत भूधारणा)

वाचा: अर्रर्र..! 5 वर्षात पीक विमा कंपन्यांनी कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा अन् शेतकऱ्यांना लावला चुना

पात्रता
• लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
• महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये.
• दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
• दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
• महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
• लाभधारकाच्या 712 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
• लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
• एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.
• ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे
• 7/12 चा ऑनलाईन उतारा
• 8 अ चा ऑनलाईन उतारा
• जॉबकार्ड ची प्रत
• सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
• सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Now he will ask that he will get ‘so much’ increased subsidy for the well; An important condition is also cancelled

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button