ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

कांदा प्रक्रिया उद्योग करा आणि भरपूर नफा कमवा…

'Make onion processing industry' and make a lot of profit

कांदा (Onion) हे भारतातील ‘नगदी पीक’ (Cash Peak) म्हणून ओळखले जाते, खरीप व रब्बी (Kharif and Rabbi) हंगामातील महत्त्वाचे पीक आहे, कांदा हा नाशवंत असून, त्यामध्ये बरेच आयुर्वेदिक (Ayurvedic) गुणधर्म देखील असतात उदाहरणार्थ मोतीबिंदू, कर्करोग, मूत्रक्षय,हृदयातील रक्तवाहिन्या (Cataracts, cancer, urinary incontinence, coronary arteries) संदर्भातील आजारांवरही अत्यंत गुणकारी ठरते.

कांदा प्रक्रियेमुळे होणारे फायदे : (Benefits of onion processing)

1) कांदा नाशवंत असल्यामुळे, बहुतांशी शेतकऱ्यांची कांदा खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते, परंतु कांदा प्रक्रियेमुळे हे नुकसान टाळता येऊ शकते.

2) बाजारपेठेत आवश्यकतेपेक्षा शेतमालाची आवक झाल्यास होणारे नुकसान टाळता येते. शेतमालामध्ये मूल्यवृध्दी होते.

3) वाहतुकीवरील होणाऱ्या खर्चात बचत होते. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

4) प्रक्रिया केलेल्या शेतमालाची निर्यात केल्यास देशाला परकीय चलनाचा पुरवठा होतो.

कांद्यावर प्रक्रिया करून पुढील पदार्थ करू शकतो. व ते बाजार मध्ये चांगल्या किमतीला विकू देखील शकतो. चला तर जाणून घेऊया कांद्यावर प्रक्रिया करून कोणते उद्योग सुरू करता येतील.

वाचा :भरघोस उत्पादन देणाऱ्या लसुणाचे नव्या वाणाची झाली निर्मिती! मिळणार कमी दिवसात अधिक उत्पादन…

कांदा पेस्ट करून बाजारांमध्ये विकणे : (Selling in the markets with onion paste)
सध्याची जीवनशैली बदलत चालली आहे, बऱ्याच शहरातल्या महिला जॉबवर जात असल्याकारणाने, बाजारात तयार केलेली कांदा पेस्टला मागणीदेखील राहते. याकरिता कापलेले कांदे तेलामध्ये तळून घेतले जातात. नंतर मिक्‍सरमधून काढून त्यांची पेस्ट केली जाते. कांदा पेस्ट (Onion paste) केल्यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते.

कांद्यावर प्रक्रिया करून वाइन / सॉस हे पदार्थ बनवणे: (Making wine / sauce by processing onions.)
कांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करून व्हिनेगर सॉस आणि वाइन (Sauce and wine) आदींची निर्मिती करता येते.

वाचा : “या” व्यवसायातून शेतकऱ्यांना मिळेल छोट्या उत्पन्नातून मोठी कमाई करण्याची संधी!

कांदे पासून पावडर तयार करणे : (Preparation of powder from onions)
कांद्यावर योग्य प्रक्रिया केल्यास, कांद्याची आर्द्रता कमी होवून त्यापासून कांदा पावडर तयार केली जाते, कांदा पावडर निर्यात केल्यास मोठी संधी आहे. योग्य पॅकेजिंग तंत्रज्ञान (Packaging technology) वापरणे अत्यावश्‍यकता असते.

कांद्याचे लोणचे करून बाजारपेठेत विक्री / किंवा त्याची निर्यात करणे : (Selling and / or exporting onion pickles in the market)
व्हिनेगर (Vinegar) किंवा तेलाचा वापर करून कांद्याचे लोणचे तयार करता येते. अमेरिका आणि युरोप बाजारपेठेमध्ये व्हिनेगर वापरून, तर आशिया-आफ्रिका बाजारपेठेमध्ये तेल वापरून बनवलेले कांद्याचे लोणचे लोकप्रिय आहे. याद्वारे देखील आपणास मोठी संधी मिळू शकेल. तसेच कांदा पडून राहून खराब होण्यापेक्षा, त्यावर प्रक्रिया करून उद्योग करणे केव्हाही चांगले.

वाचा : शेतकऱ्यांना होणार बंपर कमाई! जाणून घ्या; शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान ‘मल्टि्लेअर फार्मिंग ‘बद्दल सर्व माहिती…

कांद्यापासून तेल निर्मिती करणे : (Making oil from onions)
कांद्यापासून तेलसुद्धा तयार करता येते. प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो.

हे ही वाचा :

1. काय सांगता! पाऊसाच्या पाण्यातून चालल्यास,’या’ रोगाची होवू शकते लागण!

2. या” वनस्पतीची लागवड करा खर्च केवळ 40 हजार रुपये उत्पन्न मात्र लाखोच्या घरात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button