महाराष्ट्रात झेंडू लागवडीखाली (Marigold planting) सुमारे २०० हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील हवामानात झेंडूचे पीक (Marigold crop) वर्षभर घेता येते. हे पीक उष्ण – कोरड्या तसेच दमट हवामानात चांगले वाढते. अति पाऊस, अति थंडी, अति कडक ऊन झेंडूच्या शेतीला मानवत नाही. या हवामानात झेंडू शेती (Marigold farming) नुकसानीमध्ये जाते. अलीकडच्या काळात झेंडूच्या काही संकरित बुटक्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत व त्या थंड हवामानात उत्तम वाढतात.
वाचा –
झेंडूच्या पिकांसाठी लागणारी जमीन –
झेंडूचे पीक (Marigold crop) सर्व प्रकारच्या जमिनीत चांगले वाढू शकते. हलकी ते मध्यम जमीन झेंडूच्या पिकास मानवते. भारी आणि सकस जमिनीत झेंडूची झाडे (Marigold tree) चांगली वाढतात. परंतु फुलांचे उत्पादन फारच कमी मिळते. तसेच फुलांचा हंगामही उशीरा मिळतो. झेंडूच्या पिकासाठी (Marigold crop) भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि ७ ते ७.५ पर्यंत सामू असलेली जमीन चांगली मानवते. शेतीच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला जी मोकळी जागा असते तेथे गाजर, गवत या तणाचे प्रमाण अधिक असते.
झेंडू लागवडीसाठी पुढीलप्रमाणे पद्धत वापरा –
१) नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून पट्टा पद्धत
२) भाजीपाल्याच्या पिकात – मिश्र पीक म्हणून
३) कोरडवाहू पीक म्हणून अन्य पिकांबरोबर
४) झेंडूची स्वतंत्र लागवड
झेंडूची स्वत्रंत्र लागवड (Marigold planting) करताना जमीन हलकी नांगरून घ्यावी. नंतर दर हेक्टरी २० ते २५ गाड्या शेणखत आणि २०० ते २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत जमिनीत मिसळून सपाट वाफे अथवा सारी वाफे तयार करून या वाफ्यांमध्ये रोपांची लागवड करा.
वाचा –
झेंडू लागवड पद्धत –
झेंडूची लागवड (Marigold planting) बी पेरून रोप तयार करून केली जाते बियांपासून रोपे तयार करण्यासाठी २ x १ चौरस मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. या वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत मिसळून घेऊन २.५ सेंटीमीटर अंतरावर जर्मिनेटरची बीजप्रक्रिया (३० मिली जर्मिनेटरचे १ लिटर पाण्यातून) करून बी पेरावे व ते मातीत झाकावे. बी हाताने दाबण्यापेक्षा त्यावर बारीक माती व राक यांचे मिश्रण टाकावे व हाताने सारखे करून नंतर झारीने पाणी द्यावे. बी तयार करणे शक्य नसल्यास खात्रीच्या ठिकाणा हून बी अथवा रोपे आणावीत. झेंडूचे पीक (Marigold crop) फुलांवर असताना निवडक झाडांवर न उमललेल्या फुलांस कापडी पिशवी बांधावी. ही सुरक्षित फुले झाडावर पुर्ण तयार होऊन उमलल्यावर तोडून त्यांचा हार करून सुरक्षित ठिकाणी वाळवावा. नंतर फुले कुस्करून बी मोकळे करून ते कापडी पिशवीत बांधून ठेवावे. हे बी पुढील हंगामात रोपे तयार करण्यासाठी वापरा.
वाचा –
किडीचे नियंत्रण कसे करावे?
१) लाल कोळी : या किडीचा उपद्रव साधारणपणे फुले येण्याच्या काळात होतो. ही कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे झाडाची पाने धुरकट, लालसर रंगाची दिसतात. या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम (दोन काडेपेटी) प्रोटेक्टंट आणि २० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक (८० %) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करा.
२) केसाळ अळी : ही अळी झाडाची पाने कुरतडून खाते, त्यामुळे पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. या अळीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम प्रोटेक्टंट अथवा २० मिली क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी.
३) तुडतुडे : या किडीची पिले आणि पौढ कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने वाळतात आणि नंतर सुकतात. कोवळ्या फांद्यांमधील रस शोषून घेतल्यामुळे फांद्या टोकांकडून सुकत जातात. या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम प्रोटेक्टंट आणि १५ मिली लिटर मॅलॅथिऑन (५०% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा