इतर

शेतकऱ्यनो सावधान: RBI ने FD नियमांमध्ये केले मोठे बदल; पैसे वेळेत काढा, अन्यथा आर्थिक नुकसान शक्यता..

Major changes made by the Reserve Bank of India in FD rules; Withdraw money on time, otherwise there is a possibility of financial loss.

FD संदर्भातील एक महत्वपूर्ण बातमी आहे. आता FD करण्यापूर्वी खूप विचार करून पैसे टाकावे लागतील. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) फिक्स्ड डिपॉझिटच्या (Fixed deposit) नियमांमध्ये बदल केले आहेत. तुम्हाला हे बदल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहेत. माहीत नसतील तुम्हाला आर्थिक नुकसानास (Financial loss) सामोरे जावं लागेल. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे FD संदर्भातील नवीन नियम माहीत करून घेतले पाहिजेत. याविषयी सविस्तर माहिती पाहूया…

FD च्या मॅच्युरिटी नियम –

आरबीआयने (RBI) फिक्स्ड डिपॉझिट (Fixed deposit) नियमात एक मोठा बदल, मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही तुमच्या रक्कमेवर दावा केला नाही तर त्यावर तुम्हाला कमी व्याजदर (Low interest rates) मिळेल. हे व्याज सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजदरासमान असेल. आता बॅक्स ५ ते १० वर्षाच्या दिर्घकालीन फिक्स्ड डिपॉझिटवर (On long term fixed deposit) ५ टक्क्याहून अधिक व्याज देते तर सेव्हिंग अकाऊंटला व्याजदर ३ ते ४ टक्क्याच्या आसपास असते.

वाचा : हवामान अलर्ट: “या” जिल्ह्यात 5-6 दिवसापासून सतत पावसाचा अंदाज; काही पिकांना फायदा तर काही पिकांचे नुकसान..

वाचा : SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…

जाणून घ्या नियम –

५ वर्षाच्या कालावधीसाठी FD केली ती आज मॅच्युर होणार आहे. परंतु तुम्ही हे पैसे काढत नाही तर त्यावर दोन पर्याय होतील. जर FD वर मिळणारं व्याजदर त्या बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटवर (On a bank savings account) मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी आहे. तर तुम्हाला FD चं व्याजदर मिळत राहील. परंतु FD वर मिळणारं व्याजदर हे सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सेव्हिंग अकाऊंटवर (On a savings account) मिळणारं व्याजदरासह ती रक्कम दिली जाईल.

वाचा :  शेतकऱ्याने फक्त एक एसएमएसने ‘या’ तारीख पर्यंत करा आधार-पॅन लिंक; लिंकिंग न केल्यास येईल पैसे काढण्यास अडचण…

RBI चा नवीन आदेश –

RBI ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय की, जर फिक्स्ड डिपॉझिटची मॅच्युरिटी संपेल (The maturity of the fixed deposit will end) आणि त्या रक्कमेवर दावा केला नाही तर त्यावर सेव्हिंग अकाऊंटच्या हिशोबात व्याजदर किंवा मॅच्युर FD वर निर्धारित व्याजदर (Fixed interest rate) यापैकी जे कमी असेल ते दिलं जाईल. हा नियम व्यावसायिक, स्मॉल फायनेन्स बँक, सहकारी बँक आणि इतर स्थानिक बँकांना लागू करण्यात आला आहे.

“या” जिल्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पीक विमा देण्यासाठी दिल्या सूचना; इतर ठिकाणीही लवकरच दिला जाणार पीक विमा..

जुना नियम हा होता –

यापूर्वी जेव्हा तुमची FD मॅच्युर होत होती आणि जर तुम्ही पैसे काढले नाहीत अथवा त्यावर दावा केला नाही तर बँक तुमची FD त्याच कालावधीसाठी पुन्हा पुढे वाढवते. म्हणजे तुम्ही ५ वर्षासाठी (For 5 years) FD केली होती तर बँक पुन्हा ५ वर्षासाठी FD वाढवते. परंतु आता असं होणार नाही. परंतु मॅच्युरिटीनंतर पैसे न काढल्यास त्यावर FD चं व्याजदर मिळणार नाही. त्यामुळे मॅच्युरिटी झाल्यानंतर तात्काळ पैसे काढण्यावर भर द्या अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान (Financial loss) सहन करावं लागू शकतं.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button