इतर

अग्रलेख: लेखकाच्या नजरेतून; शेती नेहमी तोट्यात का जाते? त्या, करता कोणत्या उपाययोजना हव्यात!

Main article: From the author's point of view: Why is agriculture always at a loss? What measures should be taken to do that?

पूर्वी पासून शेती करणे खूप कष्टाचे काम तसेच जोखमीचे काम आहे, आज हि शेतीमधील जोखीम आणि कष्ट कमी झाली नाही. पूर्वीच्या तुलनेमध्ये शेतीमध्ये आजच्या युगात मोठ्या प्रमाणात खर्च वाढला आहे, तसेच कष्टाची विभागणी करण्याकरता आधुनिक तंत्रांचा (Of Modern Techniques) वापर केला जातो, पूर्वीच्या काळी शेती करणे कमी खर्चाचे होते कारण त्यावेळेस शेतकरी स्वावलंबी (Independent)होता.

पूर्वीच्या काळी बी-बियाणे पासून सर्व मजूर घरचे असल्याकारणाने उत्पादन खर्च कमी प्रमाणात असायचे, जरी बाहेरून मजूर घेतलेच तर त्यांचे मजुरीचा दरही कमी असायचा, त्यावेळेस शेतकऱ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन (Business approach) कमी अजून मिळेल ते उत्पादनांमध्ये तो समाधानी असायचा.

“या” जातीच्या कोंबडी द्वारे मिळेल वर्षाकाठी 230 अंडी पहा सविस्तर माहिती…

मात्र सध्याच्या काळामध्ये हरितक्रांतीनंतर (After the Green Revolution)शेतीचे उत्पादन वाढले देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्याकरिता प्रयत्न करू लागला शेतकरीही व्यवसायिक दृष्टीने शेती करू लागला. सहाजिकच स्वावलंबी शेतकरी, परावलंबी झाला असल्याकारणाने शेतीसाठी मजुरांची आवश्यकता निर्माण झाली त्यामुळे मजुरांचे दर हे वाढले गेले, त्यासोबत बियाणे खते कीटकनाशके यांचे दर वाढवून भेसळयुक्त बियाण्यांचा सुळसुळाट झाला. सध्याच्या काळामध्ये शेतीसाठी मजूर मिळणे फार कठीण होत गेले, मजुरांची जागा भरून काढण्यासाठी यांत्रिकीकरण वाढत गेले व त्याला लागणारे पेट्रोल, डिझेलचे (Of petrol diesel) दर वाढल्यामुळे यंत्र अवजारांचा उपयोग शेतकऱ्यांना परवडेनासा झाला.

ही शेळी देणार दिवसाला 12 लिटर दुध जाणून घ्या माहिती…

उत्पन्ना सोबत अनेक संकटही शेतकरी राजावर येऊ लागली अनेक संकटावर मात करत त्यांनी शेतीची पेरणी केली तरी नवीन नवीन रोगामुळे (Due to a new disease) तसेच किडीचा प्रादुर्भाव यामुळे शेती करणे कष्टदायक आणि खर्चिक ठरत गेले. कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट निर्माण होऊ लागली, बरेचदा कृषी विद्यापीठाकडून (From the University of Agriculture) शेतकऱ्यांना पुरेसे पाठबळ मिळत नसल्याचे दिसत आहे. हवामानाचा सातत्याने होणारे बदल व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्ग (Nature) हिरावून घेण्याचे काम करत आहे.

)या जातीच्या कोंबडी द्वारे मिळेल वर्षाकाठी 230 अंडी पहा सविस्तर माहिती…

शेतीकरता सरकार योजना मोठ्या प्रमाणात आहेत परंतु योजना लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीत अशा योजना मिळवणे देखील मोठ्या अवघड काम होऊन बसले आहे त्यात ह्याने गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे, अशा अनेक संकटावर दोन शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारामध्ये गेलाच तर अशावेळी बाजार न मिळाल्या कारणाने शेतमाल मातीमोल होतो परिणामी या बळीराजा कडे कर्जाचा (Of debt) डोंगर वाढत जातो.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटल मध्ये केव्हा ऍडमिट व्हाल? व घ्या अशी काळजी…

वास्तविक शेतकऱ्यांना किमान हमी भावाचा तरी लाभ मिळायला हवा, परंतु बहुतांशी वेळी शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जाते काळा स्वरूप शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण व्हायला लागला असल्याकारणाने शेती करणे आता अवघड होत चालले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मिळणार, अशा प्रकारचा सिक्युरिटी कोड ; काय फायदा होणार या सिक्युरिटी कोड चा जाणून घ्या

  • आता सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडला असेल एवढे कष्टमय व अडचणी असून शेतकरी शेती का करत आहे? शेतकरी राज्याचे प्रमुख उद्दिष्ट ही जगाची भूक भागविणे इतकेच असते जरी व्यावसायिक दृष्टिकोन (Business approach) शेतीमध्ये ठेवलास तरी उत्पादन खर्च भागून दोन पैसे हाती उरावे एवढीच माफक त्याची अपेक्षा असते, जगाची भूक भागवीत असताना त्याच्या स्वतः कुटुंबाचे पोट भरावे,एवढीच माफक इच्छा असते. या बळीराजासाठी काय करता येईल ?
  • बी- बियाणे खते औषधे कीटकनाशके यांचे दर माफक प्रमाणात असायला हवे तसेच ते दर्जेदार असायला हवे.
  • विज असो की पाणी शेतीसाठी प्राधान्यक्रमाने सोयी उपलब्ध केल्या जाव्यात. *आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला मिळायला हवी.
  • कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मिळणार, अशा प्रकारचा सिक्युरिटी कोड ; काय फायदा होणार या सिक्युरिटी कोड चा जाणून घ्या

  • शेतीमाल विक्री चे विविध पर्याय शेतकऱ्यांच्या भागीदारीतून निर्माण झाले पाहिजेत. *शेतीमाल उपलब्धतेनुसार मूल्य वर्धन तसेच विक्री साखळ्या विकसित झाल्या पाहिजेत पेशवे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा रास्त प्रश्न सुटणार नाही.
  • शासन व कृषी संशोधन यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर आढावा घेऊन शेतकरी राजा कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

-दिपाली सुरेश फडतरे

हेही वाचा:

1)वाराईच्या” माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होते,शेतकर्‍यांची लूट वाचा…
2) बघा, “पिक कर्ज” मिळण्याची संपूर्ण प्रोसेस फक्त एका क्लिकवर…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button