Mahindra Thar ROXX| थार प्रेमींसाठी 5-दरवाजांचा आनंद! 15 ऑगस्टला लाँचिंग|
Mahindra Thar ROXX| मुंबई, 23 जुलै 2024: भारतातील सर्वात लोकप्रिय (Popular) SUV मधील एक, महिंद्रा थार आता नव्या 5-दरवाजांच्या ‘Thar ROXX’ रुपात भेटीला येत आहे.
महिंद्राची नवीन SUV
स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) निर्मितीमध्ये अग्रणी (leading) असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी थारची 5-दरवाजांची आवृत्ती लवकरच बाजारात आणणार आहे. या नव्या व्हर्जनला “Thar ROXX” असे नाव देण्यात आले आहे.
व्हिडीओ टीझर आणि नाव
यापूर्वी, ‘थार आर्मडा’ नावाबाबत अफवा पसरल्या होत्या, परंतु कंपनीने व्हिडीओ टीझरद्वारे “Thar ROXX” हे अधिकृत नाव जाहीर केले आहे.
15 ऑगस्टला लाँचिंग
Thar ROXX लाँचिंगची उत्सुकता वाढत असताना, कंपनीने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर भारतात लाँचिंग करण्याची घोषणा केली आहे.
वाचा: Reduction in price of vegetables| मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे भाजीपाला स्वस्त! टोमॅटोची किंमत मात्र वाढली|
मोठा आणि नवीन डिझाइन
5-दरवाजांमुळे ही कार आधीच्या थारपेक्षा अधिक मोठी (big)असेल. यात पूर्णपणे नवीन डिझाइनचा फ्रंट फेस असेल.
वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान
Thar ROXX मध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट असतील जसे की:
- 10.25 इंच टचस्क्रीन
- LED प्रोजेक्टर हेडलॅम्प
- 360 डिग्री कॅमेरा
- पुश बटन स्टार्ट
- फ्रंट आणि रियर सेंटर आर्मरेस्ट
- नवीन सीट अपहोल्स्ट्री
- रियर AC व्हेंट
- सहा एअरबॅग्ज
- सनरूफ
- रियर डिस्क ब्रेक (आधीच्या थारमध्ये फक्त फ्रंट डिस्क ब्रेक होते)
इंजिन पर्याय
Thar ROXX 1.5 लिटर डिझेल, 2 लिटर डिझेल आणि 2.2 लिटर डिझेल अशा तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध (Available) असेल.