Abhay Yojana महावितरणची अभय योजना: वीज ग्राहकांना मोठा दिलासा
Abhay Yojana मुंबई : वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी (Permanently) बंद झालेल्या लाखो ग्राहकांसाठी महावितरणने मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. ‘अभय’ या योजनेअंतर्गत, राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार माफ करण्यात येणार आहे.
या योजनेचा कालावधी १ सप्टेंबर २०२४ पासून ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल. या कालावधीत थकबाकीदार ग्राहक मूळ बिलाची रक्कम विविध हफ्त्यांमध्ये किंवा एकरकमी भरून वीज कनेक्शन पुन्हा सुरू करू शकतील.
योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये:
- थकबाकी माफी: ग्राहकांना थकबाकीवरील एकूण १ हजार ७८८ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहे.
- हफ्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा: ग्राहक मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित रक्कम सहा हफ्त्यांमध्ये भरू शकतील.
- एकरकमी रक्कम भरल्यास सवलत: घरगुती आणि व्यावसायिक (Professional) ग्राहक एकरकमी रक्कम भरतील तर त्यांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहक पाच टक्के सवलत मिळेल.
- नवीन कनेक्शन: जुना पत्ता आणि पुरावे सादर करून नवीन नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.
- सर्व क्षेत्रांना लागू: भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ आणि कळवा या क्षेत्रातील ग्राहकही या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
वाचा: Shani Rasi शनिची महादशा 2025: कोणत्या राशींना शनीचा साडेसातीचा सामना करावा लागणार
महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वीज बिलाची थकबाकी भरणे बंधनकारक (Compulsory) असले तरी, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ही सवलतीची योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेमुळे लाखो वीज ग्राहक आर्थिक संकटातून मुक्त होतील आणि त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.