ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | महाराष्ट्रात आजपासून मान्सूनचे आगमन? जाणून घ्या पूर्ण आठवड्याचे हवामान अपडेट

राज्यात सध्या उष्णतेची लाट ओसरली आहे आणि शेतकरी आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत.

Weather | अशातच आता मान्सून केरळमध्ये दाखल (Monsoon enters Kerala) झाला असून, लवकरच महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon) येणार आहे. यापूर्वी मान्सून काही काळ श्रीलंकेच्या (Srilanka) वेशीवर अडकला होता. मात्र, अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून, पुढे सरकत आहे. त्यामुळे आजपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवली आहे.

राज्यात मान्सून वेळेवर?
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसण्याची शक्यता आहे. तर मेघगर्जनेसह ढगाळ आकाश असेल. राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘उत्तम ते मध्यम’ श्रेणीत नोंदवला जात आहे. या आठवड्यातही तो त्याच श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. वाराही वेगाने वाहणार आहे. महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस अगोदर मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम (Kharif season) वेळेवर आला असून यंदाची शेतीची (Agriculture) कामे वेगाने होणार आहेत.

वाचा: Flood | काय सांगता? आता महापूर येण्यापूर्वीच नागरिकांना ‘या’द्वारे मिळणारं अलर्ट, कसा ते वाचा सविस्तर

यंदाचा पाऊस समाधानकारक
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच, यंदाचा पाऊस हा समाधानकारक असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी पावसाची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आता शेतीच्या कामांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा: Weather | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सून हजर, लवकर होणार महाराष्ट्रात आगमन

मान्सूनमुळे शेतीतील उत्पादनात होणार वाढ
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पोहचण्यास 7 दिवसांचा कालावधी लागतो. मान्सूनचा वेग हा असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. केरळमध्ये यंदा वेळेवरच मान्सून दाखल झाल्याने महाराष्ट्रातही सर्वकाही वेळेवर होणार असल्याचे संकेत आहेत. तसेच, खरिपाच्या दृष्टीने वेळेवर उत्पादनात देखील वाढ होणार आहे.

राज्यात मान्सूनचे आठवड्याचे अपडेट
मुंबईत आज कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. तर आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहील. पुण्यामध्ये कमाल तापमान 36 आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहील. त्यासह आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहील. नागपुरमध्ये कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहील. तर आठवडाभर अंशतः ढगाळ आकाश असू शकतात. नाशिकमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस व किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील. तर आठवडाभर अंशतः ढगाळ आकाश असण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहू शकते. तर आठवड्यात हलके ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button