Maharashtra Weather| अवकाळी पाऊस पाठ सोडेना, शेतकरी हवालदिल; ‘या’ भागात पुन्हा एकदा अवकाळीची शक्यता
Maharashtra Weather| गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं दाणादाण उडवली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील सर्वच भागात पावसानं हजेरी लावली होती. त्यात फळबागा आणि अन्य शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं होत. तसंच गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळीनं पुन्हा हजेरी लावली होती. यानंतर परत एकदा हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केला आहे. राज्यात पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात येत्या 24 तासात उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
वाचा: विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर
काय आहे अंदाज
येत्या चोवीस तासात राज्यातील काही भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्याला हा तडाखा बसणार आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मराठवाड्यातील लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
उन्हाचा पाराही वाढला
राज्यात विविध ठिकाणी हवामान विभागानं अवकाळीचा अंदाज वर्तवला असला तरी देखील काही भागात उन्हाचा पारा वाढलेलाच राहणार आहे. राज्याच्या तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस अजून वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी 41.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर वर्धा अमरावती जळगाव या ठिकाणी तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या वर आहे. उर्वरित राज्यात तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान आहे. अवकाळी सोबतच या उन्हाच्या झळा बसल्यामुळे राज्यातील जनता आणि शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळं या वातावरणाचं करायचं काय असा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे.
कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Belt) सक्रिय
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. कर्नाटक पासून दक्षिण तामिळनाडू पर्यंत किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. खंडित वारं वाहत
आहे. तसंच आग्नेय अरबी समुद्रात वाऱ्यांची स्थिती चक्राकार आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर ही स्थिती आहे.
हेही वाचा:
- सरकारी कचेऱ्यांना वैतागलाय! काळजी करू नका, आता मोबाईलवरच मिळणार शेतीचे नकाशे
- चढ की उतार काय आहेत आज तूर ,सोयाबीन, अन् कांद्याचे ताजे बाजारभाव? त्वरित जाणून घ्या
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..