हवामान

Maharashtra Weather Update | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! राज्यात पुढचे तीन दिवस पाऊस; जाणून घ्या कुठे?

Good news for farmers! Rain for the next three days in the state; Know where?

Maharashtra Weather Update | राज्यात सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान नाही. कारण, राज्यात (Maharashtra Weather Update) सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेती पिकांसाठी पावसाची गरज असतानाही पावसानं दडी मारली आहे. मात्र, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील तीन दिवस पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. कारण, पेरणी केलेल्या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. पाऊस पडल्यास ही पिकं तग धरतील अन्यथा ही पिकं वाया जाण्याची शक्यता आहे.

वाचा : Return Monsoon | शेतकऱ्यांनो राज्यात परतीचा पाऊस कुठपर्यंत पोहोचला? जाणून घ्या पुढचे पाच दिवसाचे हवामान अपडेट

तीन दिवसानंतर राज्यात उन्हाचा चटका
दरम्यान, पुढच्या तीन दिवसानंतर मात्र राज्यात उन्हाचा चटका वाढू शकतो. 18 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यात ढगाळ वातावरण निवळून ऑक्टोबर हिटचा परिणाम पूर्ववत जाणवू लागेल अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षीची ऑक्टोबर हिट महाराष्ट्रात अधिक दाहक जाणवण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान 2 डिग्रीने तर पहाटेचे किमान तापमान 3 ते 4 डिग्रीने अधिक असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचा परिणाम अधिक असण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.

नैऋत्य मान्सून अद्यापही महाराष्ट्रातील वेंगुर्ल्यापर्यंत खिळलेलाच आहे. देशातून पूर्णपणे परतलेला नसून त्याला निरोप देण्यासाठी अजुनही वाट पहावी लागेल, अशी माहिती खुळे यांनी सांगितली. ईशान्य मान्सून तामिळनाडूमध्ये कदाचित 25 ऑक्टोबर दरम्यान सेट होण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले. सध्या चक्रीवादळाचा काळ असल्याचेही खुळे म्हणाले. उत्तरेकडे राजस्थानच्या वायव्य टोकावर स्थित पश्चिमी झंजावात आणि दक्षिणेत तामिळनाडू स्थित चक्रीय वाऱ्यांची स्थिती अश्या प्रणाल्यांच्या एकत्रित परिणामामुळं राज्यात पावसाची शक्यता आहे.

देशातील इतर भागात पावसाचा अंदाज
देशातील उत्तर प्रदेशात 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशासह, उत्तराखंडमध्येही पहाटे थंडीची लहर आहे. आज आणि उद्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंढी आणि शिमला भागात पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पेरणी केलेल्या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. पाऊस पडल्यास ही पिकं तग धरतील अन्यथा ही पिकं वाया जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Web Title: Good news for farmers! Rain for the next three days in the state; Know where?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button