Maharashtra Unlock :तुमचा जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये आहे? स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीनुसार काय सुरू? काय बंद? वाचा..
Maharashtra Unlock: At what level is your district? What starts as per local administration regulations? What's off Read on
कोरोनाच्या ( Corona) पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले होते, आज सोमवार 7 जून 2021 पासून राज्यामध्ये परिस्थितीनुसार निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्यात आले आहे. म्हणजेच राज्यामध्ये विविध उद्योगधंदे जसे की हॉटेल्स, मॉल, दुकाने, सलोन, स्पा पार्लर अशा इतर सेवांचा लाभ आपल्याला घेता येणार आहेत.
परंतु हे निर्बंध जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह (Positive) तसेच लागणारे ऑक्सिजनचे (Of oxygen) प्रमाण या दोन निकषांच्या आधारे शिथिल होणार आहेत. पाहुयात कोणता जिल्हा कोणत्या लेव्हल मध्ये येणार आहे.
हेही वाचा :व्यवसाय करण्याकरता राज्य सरकार देते मोठी संधी, जाणून घ्या; कुठे व कसा अर्ज करायचा…
मुंबई:
राज्य सरकारने जारी केलेल्या गाईडलाईनद्वारे मुबंई लेवल तीनमध्ये आहेत. मुंबईचा आताचा पॉझिटिव्हिटी रेट 5.30 टक्के आहे.
सांगली:
सांगली जिल्ह्याचा समावेश हा चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आला असला तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.
वर्धा:
वर्धा जिल्हा सध्या लेव्हल तीनमध्ये असल्यानं मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
औरंगाबाद:
औरंगाबाद पहिल्या लेव्हलमध्ये आहे तर ग्रामीण दुसऱ्या लेव्हलमध्ये आहे.
कोल्हापूर :
कोल्हापूर महापालिकेचा लेव्हल 4 मध्ये समावेश.
सातारा :
सातारा जिल्हा लेव्हल 4 मध्ये.
पुणे:
पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने राज्यशासनच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे.
पिंपरी चिंचवड:
पिंपरी चिंचवड महापालिका 5 ते 10 टक्के दर 4थ्या या गटात येत आहे.
सोलापूर:
सोलापूर महानगरपालिका दुसऱ्या तर सोलापूर ग्रामीण हद्द तिसऱ्या लेव्हलमध्ये.
लेव्हल नुसार सुरू राहणाऱ्या सेवा –
लेव्हल 1 – सर्व सुरळीत राहणार
लेव्हल 2
50 टक्के क्षमता रेस्टॉरंट सुरू,मॉल्स, लोकल ट्रेन सुरु नाही,सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण
ई सेवा पूर्ण जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के सुरू बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने जिल्ह्याच्या बाहेर प्रायव्हेट कार, बसेस, लॉंग ट्रेन, खाजगी गाड्या,टॅक्सी यांना परवानगी आहे मात्र पाचव्या लेव्हलला जाण्यासाठी ई पास लागेल.
लेव्हल 3
अत्यावश्यक दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत
इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 ( शनिवार रविवार.
हेही वाचा :