ताज्या बातम्या

महाराष्ट्राला हादरा : नाशिक मध्ये ऑक्सीजनची गळती मृतांची संख्या 22 वर, तर अजून मृतांची संख्या वाढण्याची भीती, कशी झाली ऑक्सिजनची गळती?

Maharashtra trembles: Oxygen leak kills 22 in Nashik, fears of more deaths Read in detail

एकीकडे ऑक्सिजनची कमतरता आहे तर दुसरीकडे म्हणजेच नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रूग्णालयात मध्ये टँकरमधून ऑक्सिजन भरत असताना, ऑक्सिजनची गळती झाली आहे. या दुर्घटनेत जवळपास 22 जणांचा मृत्यू झाला आहे व अजून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

नाशिक मध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाली,ऑक्सिजन टॅंकर मधून ऑक्सिजन भरण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनामार्फत धावपळ करण्यात आली.

मात्र त्याला यश मिळाले नाही त्यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन वर असणाऱ्या रुग्णालयातील रुग्णांना याचा त्रास झाला,व यामध्ये बावीस जणांनी जीव गमावला.

ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळपास 150 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. तसेच अजूनही मृत्यूचा आकडा वाढण्याची शंका व्यक्त केली जात आहे जवळपास 30 ते 35 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचा दावाही केला जात आहे.

✍️ हेही वाचा
१) काळी मिरी मुळे कोरोना मुक्त होतो का काय आहे सत्य जाणून घ्या
२) या योजनेत उघडा खाते आणि मिळवा १.३ लाख रुपयांचा फायदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button