ताज्या बातम्या

महाराष्ट्र होणार सोमवार पासून अनलॉक! राज्य सरकारने जारी केली नवीन नियमावली…

Maharashtra to be unlocked from Monday! State Government issues new regulations

महाराष्ट्र (Maharashtra) मध्ये कोरोनाच्या ( Corona) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) अंतर्गतचे निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने (By the state government) शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली. ही नवीन नियमावली सोमवार 7 जून 2021 पासून लागू करण्यात येणार आहे.याबाबतचा आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला.

आठवड्यात मध्ये, लागणारे ऑक्सिजनबेड (Oxygen bed) व पॉझिटिव्हीटी (Positivity) या दोन निकषांच्या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, या दोन निकषांच्या आधारावर प्रत्येक आठवड्यात नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत.

यापूर्वीही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती. परंतु नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती त्यामुळे सर्वच गोंधळ उडाला होता, अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली.

हेही वाचा : पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाची पेरणी करावी असे आवाहन डॉ. देवीकांत देशमुख यांनी केले…

[metaslider id=4085 cssclass=””]

पाच टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी दर आहे आणि जिथे २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील.

४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तेथील व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील.

६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा चौथा स्तर मानला जाईल आणि तेथे सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील.

हेही वाचा : येथे” मिळत आहे, 1 रुपयात साखर, बदाम, शुद्ध देसी तूप पहा; अजून काय आहेत भन्नाट ऑफर्स

काय चालू राहील?
पहिला स्तर :
पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल.

दुसऱ्या स्तर:
मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट राहील.

तिसरा स्तर :
ठिकाणी दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील.

चौथा स्तर:
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील.

पाचवा स्तर:
ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार, रविवारी ती बंद असतील.

अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1400911528010805252?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1400911528010805252%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

हेही वाचा :
मोबाईलवर शेतकऱ्यांना मिळणार हवामान अंदाज सह कृषी सल्ला पहा त्यासाठी काय करायचे?

बँकेपेक्षा अधिक व्याजदर देतील, पोस्ट ऑफिस च्या या तीन स्कीम वाचा कोणत्या आहेत, ‘या’ स्किम्स…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button