Maharashtra Politics | महाराष्ट्रात लोकसभेसोबत विधानसभेच्याही होणार निवडणुका? मुख्यमंत्र्यांकडून मिळाला पाठिंबा
Maharashtra Politics | लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर स्थापन केलेल्या कोविंद समितीला राजकीय पक्षांकडून आतापर्यंत ३५ निवेदने प्राप्त झाली आहेत. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी एकत्र निवडणुका घेण्याचे समर्थन केले आहे. एकत्र निवडणुका (Maharashtra Politics) घेतल्या तर पैशाची बचत होईलच; पण कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे शिंदे यांनी कोविंद समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरामच्या निवडणुका अलिकडेच झाल्या होत्या. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र, हरियानासह अन्य राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. एकत्रित निवडणुका झाल्यास सर्वच बचत होते, असे शिंदे यांनी म्हटले आहे. ‘एनडीए’ सरकारकडून ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यात एक देश-एक निवडणुकीचा समावेश आहे. वारंवार निवडणूक होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही.
हेही वाचा | Garlic Price | लसूण उत्पादक शेतकरी मालामाल!लसणाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या किलोला किती मिळतोय भाव?
शिंदे यांनी या मुद्द्यावर भाजपासह इतर पक्षांशीही चर्चा केली आहे. एकत्रित निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सर्व पक्षांमध्ये एकमत असल्याचे दिसून येते. काही पक्षांनी मात्र एकत्रित निवडणुका घेण्याबाबत आशंका व्यक्त केल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा जवळ आल्यास राजकीय वातावरण तापते आणि त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे काही पक्षांचे म्हणणे आहे. कोविंद समिती या सर्व निवेदनांचा अभ्यास करून आपला अहवाल सरकारला सादर करेल. त्यानंतर सरकार या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेईल.
Web Title | Maharashtra Politics | Will there be elections for Lok Sabha and Vidhan Sabha in Maharashtra? Received support from the Chief Minister
हेही वाचा