Red Alert| महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात शाळा, कॉलेजना सुट्टी; मुंबईत मुसळधार पाऊस|
Red Alert| : मुंबई, ९ जुलै २०२४: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत (disturbed) झाले आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस:
मुंबईत सकाळी मुसळधार पावसामुळे अनेक सखल (low) भागात पाणी साचले होते. यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आणि अनेक वाहतूक कोंडी निर्माण झाल्या. या पावसामुळे मुंबईतील खासगी आणि महापालिकेच्या शाळांना सकाळच्या सत्रासाठी सुट्टी देण्यात आली आहे.
वाचा:Aai Yojana| आई’ पर्यटन धोरणाचा लाभ महिलांनी घ्यावा पर्यटन विभागाचे आवाहन|
पुण्यात रेड अलर्ट:
पुणे जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा असल्याने पुणे शहर, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी आणि भोर तालुक्यातील सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे आणि कोकणात सुट्टी:
ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि बारावीपर्यंतच्या महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनाही सट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात दुसऱ्या दिवशी सुट्टी:
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर ८ जुलैलाही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
सावधानतेचा इशारा:
प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन (appeal) केले आहे. लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि धबधब