Maharashtra Rain | महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट|
Maharashtra Rain | जून महिन्यात कमकुवत असलेला मान्सून (Monsoon) आता पुन्हा जोरदार झाला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) होत आहे. पुढील 72 तासांत काही भागात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने (IMD) चेतावणी दिली आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने गुरुवार आणि शुक्रवारीही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
आजपासून 9 जुलैपर्यंत मुंबईसह अनेक जिल्ह्यात पाऊस:
IMD च्या अंदाजानुसार, आजपासून 9 जुलैपर्यंत मुंबई, पुणे, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा जोर वाढणार असून, घाटमाथ्यावर अतिवृष्टी (heavy rain) होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाही पुढील दोन दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
वाचा:Strange incident| चंद्रपूरच्या बकरीला माणसासारखं पिल्लू! जन्मताच मृत्यू, गावात खळबळ|
विदर्भ-मराठवाड्यातही पावसाची शक्यता:
मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यात तुरळक (Sporadic) ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यातही पुढील दोन दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
खबरदार! अशा ठिकाणी जाणे टाळा:
पावसामुळे अनेक नद्या आणि ढगांचे पाणी वाहून जात आहे. नागरिकांना नद्या, ओढे आणि ढगांच्या पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, तुम्ही घरात असाल तर घराबाहेर पडण्यापूर्वी हवामान अंदाज तपासून घ्या.