बाजार भाव

Market Rates | कांद्याच्या दरात चढ-उतार, काही बाजारपेठेत भाव 30 रुपये प्रति किलोपर्यंत!

Market Rates | सोलापूर आणि धुळ्यासारख्या काही बाजारपेठेत कांद्याच्या दरात घसरण, तर कोल्हापूर आणि मंगळवेढा सारख्या बाजारपेठेत वाढ झाली आहे.

कोल्हापूर बाजारपेठेत कांद्याचा भाव 30 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे, जो निर्यातबंदी उठल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक भाव आहे.

दुसरीकडे, सोलापूर, धुळे आणि जालना सारख्या बाजारपेठेत कांद्याचा किमान भाव 100 ते 300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे.

कमी आवक आणि साठवणुकीमुळे भाव वाढीला चालना

राज्यातील बहुतांश मंडईंमध्ये कांद्याची आवक कमी आहे. निर्यातबंदी उठूनही भावात फारसा बदल न झाल्याने अनेक शेतकरी आता कांदा साठवून ठेवत आहेत. रब्बी हंगामातील कांदा ऑक्टोबरपर्यंत साठवता येतो, त्यामुळे शेतकरी तातडीने विकण्याऐवजी साठवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.

बुधवारी राज्यातील केवळ तीन मंडईंमध्ये 10 हजार क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली. पिंपळगाव-बसवंत येथे सर्वाधिक 20 हजार क्विंटल कांद्याची विक्री झाली

वाचा:Stamp Duty On Loans | राज्य शासनाचा मोठा निर्णय! ‘इतक्या’ कर्जावरील मुद्रांक शुल्क होणार माफ; वाचा आनंदाची बातमी.

विविध बाजारपेठेतील कांद्याचे दर:

  • जालना: किमान 150 रुपये, कमाल 1300 रुपये, सरासरी 800 रुपये प्रति क्विंटल
  • जुन्नर: किमान 300 रुपये, कमाल 2600 रुपये, सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल
  • धुळे: किमान 100 रुपये, कमाल 1100 रुपये, सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल
  • लासलगाव: किमान 500 रुपये, कमाल 1701 रुपये, सरासरी 1380 रुपये प्रति क्विंटल

कांद्याच्या दरात चढ-उतार कायम आहेत. काही बाजारपेठेत भाव चांगले आहेत तर काही बाजारपेठेत शेतकऱ्यांना कमी भावाला कांदा विकावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button