हवामान

Orange Alert| महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी घ्यावी काळजी

Orange Alert| मुंबई: राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः कोकण आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात (in forecasting) आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकारात्मक परिणाम:

सध्या राज्यात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे शेतीलाही फायदा होणार आहे.

कोकण आणि घाटात मुसळधार पाऊस:

हवामान विभागाच्या मते, उद्या कोकणात सर्वत्र मुसळधार (heavy) ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा: Sugarcane sieve| साखर उद्योगात खळबळ: एक ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू करण्याची मागणी

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता:

उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातही उद्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज (estimate) आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात देखील उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता:

सोमवार दिनांक 26 ते शुक्रवार 30 ऑगस्ट दरम्यानच्या पाच दिवसादरम्यान कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाचा पारा चढण्याची शक्यता

नागरिकांनी घ्यावी काळजी:

दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नागरिकांनी निसर्गत (in nature) : आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या काळजीबाबतची सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button