Monsoon News | आनंदाची बातमी! मुंबईत 10 जूनला, तर 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून ची हजेरी!
Monsoon News | उकाड्याने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागानुसार, येत्या 10 ते 11 जून दरम्यान मुंबईत पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल.
यावर्षी, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मान्सूनची आगमन:
दरम्यान, केरळमध्ये मान्सून आगमन झाले आहे आणि उत्तर भारतातही उष्णतेचा तडाखा कमी होत आहे. रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनच्या (Monsoon News) प्रवासाला गती मिळाली आहे आणि पुढील 2-3 दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
वाचा :Minimum Bank Balance | बँक खात्यात निगेटिव्ह व मिनिमम बॅलन्स: काय आहेत नियम?
विदर्भ आणि मराठवाड्यात वाढणारे तापमान:
विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र, वाढत्या तापमानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने (Weather News) पुढील एक ते दोन दिवसांत विदर्भात तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. या काळात कमाल तापमान 44 ते 49 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम:
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. जून महिन्यातही उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
29 मे पासून नवीन पश्चिमी विक्षोभ:
29 मे पासून एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की, 3 दिवसांनंतर पडणाऱ्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल.