हवामान

Yellow Alert |महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट! पुढील तीन-चार दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर मध्ये हलका ते मध्यम पाऊस!

Yellow Alert |मुंबई, 17 जून: मागील 48 तासांपासून राज्यात पावसापेक्षा उन्हाळी वातावरण अनुभवल्यास, हवामान विभागाने आता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन-चार दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सूनचा वेग मंदावला, ढगाळ वातावरण नाही

यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली आणि पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. परंतु त्यानंतर त्याचा वेग मंदावला आहे. सध्या दक्षिण भारतात पावसाची संततधार तर काही भागांमध्ये कोसळधार सुरू असली तरीही, महाराष्ट्रात मात्र त्याचा जोर कमी झाला आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण नसल्याने प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेचा त्रास वाढला आहे.

वाचा:Insurance premium | महाराष्ट्रात ८ फळपिकांसाठी हवामान आधारित विमा योजना सुरू! पण रक्कम मध्ये मोठी वाड.

तापमानात वाढ, ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीपासून थेट विदर्भापर्यंत सक्रिय असणाऱ्या मान्सूनचा जोर कमी झाल्याने तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे आणि काही भागांमध्ये ३५ ते ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून वारे नसूनही, वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

पुढील आठवड्यात संपूर्ण देशात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता

हवामानाच्या अंदाजानुसार, पुढील तीन-चार दिवसांत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी पावसाची शाखा आणखी सक्रिय होईल आणि बंगालच्या उपसागरातील शाखा या आठवड्यात सक्रिय होऊन पुढच्या दिशेने वाटचाल सुरू करेल. त्यामुळे आता पावसाशी गाठभेट थेट २० ते २१ जूनला होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून संपूर्ण देशभरात सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागतील.

उत्तर भारतात उष्णतेची लाट

महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा असतानाच, दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी तापमान ४४ ते ४५ अंशांच्या घरात आहे आणि प्रयागराजमध्ये ४७ अंशांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. वाढत्या उकाड्यामुळे हवामान विभागाने नागरिक आणि यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गरजेनुसारच घराबाहेर पडण्याचा सल्ला नागरिकांना दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button