हवामान
Weather News| जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित|
Weather News| |मुंबई: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक (More) पाऊस पडण्याची शक्यता आहे. लेह, लडाख आणि पूर्व तमिळनाडू वगळता देशातील इतर सर्व राज्यांमध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पावसाचा अंदाज:
- मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत: सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पाऊस.
- दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या फलटण, माण, खटाव, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये: सरासरीपेक्षा १०६ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस.
- जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत: सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४ टक्के पाऊस.
वाचा:New Delhi| पंतप्रधान किसान योजनेत शेतकऱ्यांना 8 हजार रुपये हप्त्याची मागणी|
कमाल तापमान:
जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या ३ वाजताचे कमाल तापमान (Maximum temperature) हे जुलैतील सरासरी कमाल तापमानापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
किमान तापमान:
संपूर्ण महाराष्ट्रात जुलै महिन्यात पहाटे ५ वाजताचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाचे मुद्दे:
- जुलै महिन्यात ‘ला-निना’चा प्रभाव (influence) जाणवणार आहे.
- ‘एमजेओ’मुळे १० जुलैपर्यंत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
माहिती स्त्रोत:
- भारतीय हवामान विभाग, पुणे
- माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान विभाग, पुणे