Maharashtra Moneylenders Act | शेतकऱ्यांच्या जमिनीला आता सुरक्षा! सावकारांच्या तावडीतून जमीन परत मिळणार ..
Maharashtra Moneylenders Act | Farmers' land is now safe! The land will be returned from the clutches of moneylenders.
Maharashtra Moneylenders Act | महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम- २०१४ अंतर्गत, शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेताना एखादी मालमत्ता तारण म्हणून ठेवली असेल आणि सावकाराने बळजबरीने ती बळकावली असेल,(Maharashtra Moneylenders Act ) तर अशी जमीन शेतकऱ्याला परत मिळू शकते. मात्र, यासाठी शेतकऱ्याला १५ वर्षांच्या आत जिल्हा निबंधकांकडे तक्रार करणे आवश्यक आहे.
यापूर्वी, अशी जमीन परत मिळवण्यासाठी शेतकऱ्याला कोर्टात जावे लागत असे. यासाठी मोठा खर्च आणि वेळ लागत असे. आता, जिल्हा निबंधकांकडे तक्रार केल्यास, त्यांनी तपासणी करून जमीन शेतकऱ्याला परत देण्याचा निर्णय घेऊ शकतात.
या नवीन मार्गामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे.
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
शेतकऱ्याने संबंधित जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अर्ज करावा लागतो. गोपनीय पद्धतीने अर्ज करायचा असतो. अर्ज केलेच्या तारखेपासून १५ वर्षे मागे संबंधित जमिनीची रेजिस्ट्री झाली असल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम- २०१४अंतर्गत शेतकऱ्याला न्याय मिळतो. शेतकरी एका साध्या कागदावर लिहून अर्ज करू शकतो. माझ्या जमिनीवर संबंधित व्यक्तीने ताबा मिळवला, अशी तक्रार असते. तसेच पुरावा म्हणून शेतकरी सावकाराकडून घेतलेले कर्ज, त्यावरील व्याज यासंबंधीची लिखापढी सादर करू शकतात.
सावकारी कर्जावर व्याजदर किती?
राज्याच्या सहकार विभागाने १६ सप्टेंबर २०१४ रोजी प्रसिद्ध केलल्या अधिसूचनेनुसार सावकारी कर्जावरील व्याजदर निश्चित केले आहेत. त्यानुसार सावकाराने शेतकऱ्याला दिलेल्या तारण कर्जाला प्रतिवर्ष ९ टक्के आणि विनातारण कर्जाला प्रतिवर्ष १२ टक्के व्याजदर ठरलेला आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कर्ज देताना तारण कर्जाला प्रतिवर्ष १५ टक्के आणि विनातारण कर्जाला १८ टक्के व्याजदर आकारण्याची अट आहे.
वाचा : Rule Change From 1 November | गॅस सिलेंडर, CNG-PNG, GST, शेअर बाजारात शुल्क, लॅपटॉप आयात…1 नोव्हेंबरपासून होणार मोठे बदल!जाणून घ्या सविस्तर …
सावकारी कायद्यातील प्रमुख बाबी…
- सावकारीचा परवाना मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्या क्षेत्रात सावकारी करता येत नाही. तसेच कर्जदाराकडून सरळव्याज पद्धतीने व्याज आकारवायचे असून चक्रवाढ पद्धत लागू नाही.
- मुद्दलाच्या रकमेपेक्षा जास्त व्याज सावकाराला घेता येणार नाही. एखादी व्यक्ती विनापरवाना सावकारी करत असल्यास जिल्हानिबंधक किंवा सहाय्यक निबंधक कधीही वॉरंटशिवाय प्रवेश करून चौकशी करतील.
कायद्यातील कलम १६नुसार दस्तऐवज तपासणीनंतर कर्जदाराने सावकाराकडे तारण ठेवलेली व मालमत्ता सावकाराच्या कब्जात असल्याची खात्री पटल्यास मालमत्तेचा कब्जा कर्जदाराला दिला जातो.
- निबंधकांच्या आदेशाने व्यथित झालेल्या व्यक्तीस (कर्जदार किंवा सावकार) निर्णयाच्या दिनांकापासून एका महिन्यात विभागीय निबंधकांकडे अपील करता येईल. विभागीय निबंधकानं दिलेला निर्णय मात्र अंतिम राहिल.
- विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ५० हजार रुपयांपर्यंत किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील.
नवीन मार्गाचे फायदे
- शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होईल.
- कोर्टात जाण्याची गरज भासणार नाही.
- खर्च आणि वेळ वाचणार आहे.
हेही वाचा :
Web Title : Maharashtra Moneylenders Act | Farmers’ land is now safe! The land will be returned from the clutches of moneylenders.