Relief| महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा| दूधाला प्रतिलिटर 35 रुपये भाव, शासनाकडून 5 रुपये अनुदान|
Relief| मुंबई, 3 जुलै: आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरच्या किंमतीत घसरण (fall in price) झाल्याने आणि त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर झाल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी राज्यभरातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, राज्यातील सर्व खासगी (Private) आणि सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रुपये भाव देण्याचे निश्चित केले आहे. यासोबतच, शासनाकडून शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान दिले जाईल.
याचा अर्थ, आता शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर 35 रुपये मिळतील. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 50 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वाचा: Plan| कोल्हापुर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी नवीन योजना: उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत आणि प्रदूषणमुक्त शेती|
दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, शासनाने राज्यातील दूध प्रकल्पांना प्रति किलो 30 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही अनुदानाची मर्यादा 15 हजार मॅट्रिक टनपर्यंत असेल.
याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांची अनुदान (grant) प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे त्यांच्यासाठी 15 जुलैपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर माहिती अद्यावत करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले की, “शासन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास कटिबद्ध आहे.”