ताज्या बातम्या

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा नवे गृहमंत्री (Home Minister) ठरले दिलीप वळसे पाटील…

Maharashtra Home Minister Anil Deshmukh resigns as new Home Minister Dilip Walse Patil See detailed report.

महाराष्ट्राचे गृहमंत्री( Home Minister) अनिल देशमुख यांना माजी पोलीस आयुक्त परमार सिंग प्रकरण चांगलेच भोवल्यावर त्यांनी अखेरीस मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्त केला. परंतु राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री जबाबदारीच्या या रिक्त पदावर काम करण्याची संधी कोणत्या नेत्याला मिळणार ? याबाबत विविध तर्क लावले जात होते. हे पद ज्येष्ठ नेते आणि उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाण्याच्या बातम्या येत होत्या. या पदासाठी आणखीही काही नेतेमंडळी यांची नावे चर्चेत होते.

काल संध्याकाळी नवीन गृहमंत्र्यांचा(Home Minister) चेहरा दिलीप समोर आला. दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर अखेरी शिक्कामोर्तब झाला तर गृहमंत्री शर्यतीमध्ये हसन मुश्रीफ यांचे नाव ही चर्चेत होते. मात्र, त्यांना कामगार मंत्री( labour department) ही जबाबदारी मिळणार आहे.

उत्पादन शुल्क खात्याचा ( utpadan shulk Khate) कारभार हा उपमुख्यमंत्री अजित पवार स्वीकारतील.

हे जबाबदारीचे पद कोणाला मिळणार याची उत्सुकता मात्र वाढली होती . वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. वळसे पाटील यांना राज्यकारभाराचाही अनुभवही मोठा आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीत एक स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याकडे गृहखाते( Home Minister) जाणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी गरजेचे होते. वळसे-पाटलांकडे गृहमंत्रीपदाची ( Home Minister) जबाबदारी सोपवली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button