ताज्या बातम्यादिनंदीन बातम्या
5 grant of Rs| महाराष्ट्रात गायीच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान; 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत वाढली|
5 grant of Rs| अमरावती, 20 जुलै: राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांना (to milk projects) दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबत शासनाने घेतलेला निर्णय आता 30 सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) यांनी 30 सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मुंबई यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
अनुदान योजनेचे लाभार्थी:
- सहकारी दूध संघ
- खाजगी दूध प्रकल्प
- दूध शितकरण केंद्र
- फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित)
अनुदानासाठी आवश्यक:
- डीबीटीसाठी दूध उत्पादक (Manufacturer) शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्ड आणि पशुधनाच्या कानातील बिल्ल्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
- दूध उत्पादक शेतकरी हे दूध संघ किंवा खाजगी प्रकल्पाला दूध पुरवठा करणारे असावेत.
- सहकारी संघ आणि खाजगी प्रकल्पांनी शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यासाठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
वाचा:Corona virus| धक्कादायक! कोरोनातून बरे होऊनही सुटका नाही, संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर; ‘हे’ होतात दीर्घकालीन परिणाम
अधिक माहितीसाठी संपर्क:
- प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी (officer), अमरावती