ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

जाळ अन् धूर संगटच! महाराष्ट्रात तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, ‘या’ तारखेला होणार मतदान

Election | राज्यातील राजकारणात सध्या विविध घडामोडी पाहायला मिळत आहे. नुकतीच आता अंधेरीची पोट निवडणुक पार पडली आहे. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मोठी घोषणा केली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम (Financial) जाहीर केला आहे. ज्याची तारीख देखील सांगण्यात आली आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार 24 तास वीज, जाणून घ्या सविस्तर

‘या’ तारखेला होणार मतदान
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांकरता 18 डिसेंबरला मतदान होईल. याच करता संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ज्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज: लम्पीमुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 973 पशूंची ‘इतक्या’ कोटींची भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा

कधी लागणार निकाल?
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीप्रमाणे 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांकरता 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. या मतदानाची वेळ 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी आहे. त्यानंतर 20 डिसेंबरला मतमोजणी होईल आणि त्याच दिवशी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Fire and smoke together! As many as 7 thousand 751 gram panchayat elections have been announced in Maharashtra, voting will be held on date

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button