Maharashtra Drought | अर्रर्र..! महाराष्ट्रात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ; तब्बल 1021 महसूल मंडळात दुष्काळदृश्य परिस्थिती घोषित
Maharashtra Drought | Arrrr..! Drought in 40 Talukas in Maharashtra; Drought situation declared in as many as 1021 revenue circles
Maharashtra Drought | राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर आता राज्यातील 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात येणार आहे. यानुसार या महसुली मंडळांमध्ये (Maharashtra Drought) दुष्काळ जाहीर सवलती लागू करण्यात येणार आहेत.
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळामध्ये 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुके समाविष्ट आहेत.
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष ठरवताना जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार केला.
वाचा : Drought | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ३ हजार कोटींचा प्रस्ताव तयार; कोणाला मिळणार लाभ?
दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या 1021 महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये पर्जन्याच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या तालुक्यांची परिस्थिती पाहून दुष्काळ जाहीर सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
दुष्काळ जाहीर सवलतींमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, बियाणे, खते, पाणीपुरवठा, वीज बिलात सूट, पशुपालन, मत्स्यपालन, ग्रामीण रोजगार इत्यादी क्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या सवलतींचा समावेश आहे.
या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि इतर नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा
Web Title : Maharashtra Drought | Arrrr..! Drought in 40 Talukas in Maharashtra; Drought situation declared in as many as 1021 revenue circles