महाराष्ट्र दिन विशेष: “मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देश”
Maharashtra Day Special: "Mars Country Holy Country Maharashtra Country"
महाराष्ट्राचे वर्णन करताना राम गणेश गडकरी म्हणतात,
“राकट देशा,कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा,कोमल देशा, फुलांच्याहि देशा,|| अशा सुंदर आणि शैलीदार ओळी या महाराष्ट्र देशासाठी वापरल्या आहेत.
1 मे 1960 रोजी, महाराष्ट्राला नव्या स्वतंत्र राज्याचा दर्जा निर्माण झाला. तेव्हा पासून या दिवसाला” महाराष्ट्र दिन” म्हणून ओळखला जाऊ लागला. सर्वोत्तम योग म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कामगार दिन दिवशी साजरा केला जातो.
हेही वाचा: सोयाबीन लागवड करण्यापूर्वी घ्या अशी काळजी
संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज,संत रामदास महाराज, संत गोरा कुंभार,संत सावता माळी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, अशा एक नाही अनेक संतांनी मिळून महाराष्ट्राला एक सामाजिक विचार रुजवण्याचा प्रयत्न केला.
तसेच महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्यासारख्या समाजसुधारकांनी समाजप्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.
हे महाराष्ट्र राज्य अधिक शक्तिशाली व्हावे,यासाठी अनेक लोक नेते,बुद्धिवादी लेखक, पत्रकार आणि मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पनात अनेक जण महाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.
हेही वाचा अशी करा’, सुगंधित गवातची लागवड आणि मिळावा भरघोस उत्पन्न!
कवी कुसुमाग्रज म्हणतात,
“माझ्या मराठी मातीचा ललाटास टिळा.
म्हणजेच कवींना सांगायचं आहे की, ही मराठी माती इतकी पवित्र आहे, की या मातीचा दररोज कपाळाला टिळा लावून आपण देखील पवित्र होवू.
महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य,कला, शिक्षण, क्रीडा संस्कृती नाट्य,चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक,विज्ञान अशा विविध क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली आहे.
आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाबद्दल जाणीव ठेवत, वैभवशाली तत्त्वांना जपत प्रगतीची नवनवीन शिखरे गाठण्यासाठी नवीन निर्धार आपणास करायला हवा.
हेही वाचा: कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटल मध्ये केव्हा ऍडमिट व्हाल? व घ्या अशी काळजी…
तसेच,कोरोना महामारी मध्ये एकमेकांना नवीन उमेद, नवीन आशा तसेच एकमेकांना आधार देत आपल्याला पुढे जायचे आहे.
या काळात माणुसकीच्या हातांची जास्त गरज आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राला आपल्या मजबूत हाताची गरज आहे. तर सर्वांनी मिळून या कोरोनावर मात करूया व लवकर करोनाचे संकट दूर करूयात.
” मी E शेतकरी टीम कडून,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
जय हिंद जय महाराष्ट्र!
हेही वाचा: सावधान! “इतक्या मिनिटांमध्ये निर्माण होऊ शकतो, कोरोनाचा धोका”…
हे ही वाचा:
१) या योजनेत खाते उघडा मिळवा १.३ लाख रुपयांचा फायदा तसेच या खात्याचे आहे अनेक फायदे.
२) उन्हाळ्यामध्ये घ्या फळबागांची अशी काळजी