आज महाराष्ट्र राज्याचा अर्थ संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अर्थमंत्री देसाई यांनी सादर केला. अजित पवार यांनी सांगितले कि राज्यातील ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. कोरोनाच्या काळामध्ये कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला सावरले असेही त्यांनी सांगितले. राज्यात २७८ जलसिंचनाची कामे सुरु आहेत. तसेच बळीराजा जलसिंचन प्रकल्पा अंतर्गत ९१ प्रकल्पांची कामे सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला. विकेल ते पिकेल या योजनेसाठी २१०० कोटी किमतीचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय प्रकल्प राबविला जात आहे. अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना तालुका स्तरावर सुरु करण्यात आली आहे. विदर्भातील अमरावतीमध्ये संत्रा संशोधन केंद्र सुरु करणार असल्याचीही माहिती दिली.
शेतकऱ्यांना ३ लाख रुपया पर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने दिले जाईल. Crop loans up to Rs 3 lakh will be given to farmers at zero percent rate.४२ हजार कोटीचे पीक कर्ज यंदा वाटप करण्यात आले आहे. बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटी रुपयांची योजना राबविणार असल्याचीही माहिती दिली.
नाशिक जिल्ह्यामध्ये संत्रा उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग सुरु करण्यात येणार तसेच, राज्यातील कृषी विद्यापीठांना २०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. कृषी पंप वीज जोडणी धोरण राबविण्यासाठी १५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत.
WEB TITLE: Maharashtra budget: 31 lakh 23 thousand farmers in the state benefit from debt relief…