महाबीज बियाणे मिळेल पण, एका अटीवर कृषी सेवा संचालकांची मनमानी कारभार वाचा सविस्तर बातमी…
Mahabeej seeds will be available, but on one condition read the arbitrary actions of the Director of Agricultural Services Detailed News
अकोला (वाडेगाव): खरीप हंगाम जवळ (kharif season) आल्यामुळे शेतकरी वर्गाची पेरणी करण्यासाठी बी- बियाणे व खते खरेदीची लगबग चालू झाली आहे, याकरता सोयाबीनचे बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर गेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांचा तुटवडा (Seed shortage) असल्याचा बहाणा सांगत इतर महागड्या कंपनीचे बियाणे अथवा किट घेण्याची सक्ती केली जात आहे.
त्याचप्रमाणे कृषी सेवा केंद्राचे संचालक (Director of Agricultural Service Center) दिले फाडून बियाणी बुक झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना परत पाठवत आहे, यामुळे शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे (To the agricultural authorities) गोदाम तपासणी करावी अशी विनंती केली.
कोविड प्रादुर्भाव (Covid outbreak) लक्षात घेता खते बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता शासनाने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारे खते व बियाणे आणि शेताच्या बांधावर उपलब्ध करून द्यावी असे सांगण्यात आले तरीही कृषी सेवा केंद्र संचालकमनमानीपणे आपला कारभार चालू ठेवत आहेत.
वाडेगाव येथे कृषी सेवा केंद्रातून महाबीज बियाणे (Mahabeej seeds) घेणाऱ्या शेतकऱ्यांना सक्तीने इतर कंपन्यांचे बियाणे अर्थ व लिक्विड किट घेण्याची सक्ती कृषी संचालकांनी केली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी कृषी अधिकाऱ्यांकडे केली.
हेही वाचा:
1)कोरोनाचे संक्रमण हवेतून होण्याचा धोका, सरकारी नव्या गाईडलाइन्स नुसार ‘घ्या’ अशी काळजी!