कृषी बातम्या

महाबीज ला कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे किंमत वाढ संदर्भात ‘ हे ‘ निर्देश; तसेच आत्ता होणार बियाणे विक्री नंतर ट्रेकिंग यंत्रणा…

Mahabeej directed by Agriculture Minister Dadaji Bhuse regarding price hike; Also the tracking system after the sale of seeds will be done now Site title Title Primary category Separator

राज्यामध्ये हंगामाचे एक कोटी 41 लाख 94 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यामध्ये ज्वारी,बाजरी,भात,मका,तूर मूग,उडीद,भुईमूग,सोयाबीन,कापूस ही प्रामुख्याने पिके घेतली जातात. मात्र यावर्षी डिझेल,पेट्रोल यांच्या दरवाढीचा भडका यामुळे शेतामधील खते व पिकांच्या औषधांच्या किंमती मध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांवर एकामागून एक येणारी नैसर्गिक संकटे आणि त्याच्यात ही महागाई त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. यावर्षी राज्यामध्ये 16 लाख हजार बियाणांची गरज असून ही गरज राष्ट्रीय बीज निगम आणि खाजगी कंपन्या, महाबीज यांच्या कडून पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना सोयाबीन सह अन्य पिकांचे बियाणे पुरवताना त्यांच्या किमतींमध्ये वाढ करू नका असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी महाबीज ला सांगितले आहे. मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत कृषिमंत्री बोलत होते. त्या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.


मागील वर्षी सोयाबीनची कमतरता भासत होती. सोयाबीन बियाणे बाबतीत बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे स्वतःकडील वापरावे याबाबत आवाहन करण्यात आले आहे. सध्या शेतकऱ्यांकडे सुमारे 20 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. बियाणे विक्री नंतर ट्रेकिंग यंत्रणा तयार करण्यात येणार आहे त्यामध्ये पुरवठा विक्री बियाणांची उपलब्धता अशा संदर्भात बियाण्यांची माहिती उपलब्ध होईल. तसेच पारंपारिक बियाणे सोबतच सुधारित भाजीपाल्याच्या बियाणेकडे महाबीज ने लक्ष द्यावे निर्देशही कृषिमंत्री श्री दादासाहेब भुसे यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button