ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Magel Tyala Yojana | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘मागेल त्याला योजने’त तुमचं नाव आहे का? चुटकित पाहा लाभार्थी यादी

Attention farmers! Is your name in 'Magel Aye Yojana'? Check Beneficiary List at a Glance

Magel Tyala Yojana | महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्यासाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार विविध कृषी उपक्रमांसाठी अनुदान देण्यात येईल. या योजनेनुसार, शेतकऱ्यांना शेततळे, फळबाग, ठिबक/तुषार सिंचन, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर यापैकी कोणत्याही घटकासाठी अनुदान मिळू शकेल. यासाठी, शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

या योजनेसाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही अट नाही. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी मदत होईल. तसेच, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.

योजनेची कार्यवाही
या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जाईल. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर, पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल. अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.

शेतकऱ्यांनी काय करावे?
महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
अर्जाची छापील प्रत ग्रामपंचायत किंवा कृषी कार्यालयात सादर करावी.
शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी किंवा कृषी विभागाच्या कार्यालयांशी संपर्क साधावा.

वाचा : Earthquake | भारतात भूकंपाची तलवार डोक्यावर? जाणून घ्या भूकंपप्रवण क्षेत्रातील आपल्या राज्याची जोखीम…

लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासावे?
तर शेतकरी मित्रांनो मागेल त्याला योजनेत तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्हाला राज्य सरकारच्या महाडीबीटी फार्मर स्कीम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/LotteryReport या पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर गेल्यानंतर यामध्ये लाभार्थी यादी यावर क्लिक करावे लागेल. यानंतर योजना आर्थिक वर्ष अशी माहिती निवडून तुम्ही लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तपासू शकता.

हेही वाचा :

Web Title: Attention farmers! Is your name in ‘Magel Aye Yojana’? Check Beneficiary List at a Glance

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button