Magel Tyala Solar Pump | मागेल त्याला सौर पंपमधून सौर पंपाची प्रक्रिया आणखी एक चालना आहे. ज्या व्यक्तीनी यासाठी अर्ज केला होता आणि त्यांचे पेमेंट पूर्ण झाले आहे आता वेंडर निवडीचा (व्हेंडर पर्याय) पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. चला तर मग या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती.
वेंडर निवड का महत्वाची आहे? वेंडर म्हणजे तो कंपनी किंवा व्यक्ती जो तुमच्यासाठी सौर पंपची खरेदी आणि स्थापना करणार आहे. त्यामुळे चांगला वेंडर निवडणे खूप महत्वाचे आहे. एक चांगला वेंडर तुमच्यासाठी योग्य प्रकारचा सौर पंप निवडेल आणि त्याची योग्य पद्धतीने स्थापना करेल.
वेंडर निवडण्याची प्रक्रिया महावितरणच्या पोर्टलला भेट द्या: सर्वप्रथम तुम्हाला महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमच्या खात्यात लॉगिन करावे लागेल. लाभार्थी सुविधा विभागात जा: लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ‘लाभार्थी सुविधा’ हा विभाग शोधायचा आहे. अर्जाची सद्यस्थिती तपासा: या विभागात जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता.
वेंडर निवडा: जर तुमचे पेमेंट पूर्ण झाले असेल तर तुम्हाला वेंडर निवडण्याचा पर्याय दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या विविध वेंडरमधून निवड करायची आहे. ओटीपी प्रमाणीकरण: वेंडर निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल. हा ओटीपी तुम्हाला वेबसाइटवर भरून प्रक्रिया पूर्ण करायची आहे.