ताज्या बातम्या

Anganwadi Workers | मोठी बातमी! अंगणवाडी सेविका, मदतनिसांना मिळणार १ लाख रुपये, जाणून घ्या फायदा काय?

Anganwadi Workers | Big news! Anganwadi workers, helpers will get Rs 1 lakh, know what is the benefit?

Anganwadi Workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एकरकमी लाभ योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमुळे १ एप्रिल २०२२ पासून सेवानिवृत्त, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या अंदाजे ५ हजार ६०५ कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. अंगणवाडी सेविकांना (Anganwadi Workers) प्रत्येकी १ लाख रुपये आणि मिनी अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनिसांना प्रत्येकी ७५ हजार रुपये पर्यंत लाभ मिळेल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीसाठी ही योजना लागू राहील. या योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हा लाभ देताना शासन निर्णय ३० एप्रिल २०२४ मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनाद्वारे देण्यात येणार आहे. या योजनेसाठी येणाऱ्या खर्चासही मंजूरी देण्यात आली आहे.

वाचा | Agriculture Scheme | मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी नवी योजना! शेतकऱ्यांना होणार ‘असा’ होणार लाभ; जाणून घ्या सविस्तर

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते विजय वडेटि्टवार यांनी विधानसभेत याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Web Title | Anganwadi Workers | Big news! Anganwadi workers, helpers will get Rs 1 lakh, know what is the benefit?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button